सोलापुरच्या चादरीची केरळ पूरग्रस्तांना उब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 02:35 PM2018-08-22T14:35:57+5:302018-08-22T14:38:05+5:30

दोन ट्रक रवाना : राज्य सरकारने घेतला पुढाकार

Kerala's flood affected areas of Solapur | सोलापुरच्या चादरीची केरळ पूरग्रस्तांना उब

सोलापुरच्या चादरीची केरळ पूरग्रस्तांना उब

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्र सरकारने केरळमधील पूरग्रस्त जनतेला मदतमदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने दोन ट्रक चादर रवानापाच हजार सतरंजी आणि तीन हजार लुंग्यांचा समावेश

सोलापूर : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्टÑ सरकारने सोलापुरातून लुंगी, चादर आणि सतरंजींचे दोन ट्रक मंगळवारी सायंकाळी रवाना केले. 

महाराष्ट्र सरकारने केरळमधील पूरग्रस्त जनतेला मदत पुरविण्यासाठी महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सची मदत घेतली आहे. त्यांच्या सहकार्याने क्रेडाईच्या माध्यमातून मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने दोन ट्रक रवाना झाले आहेत. यात १० हजार चादर, पाच हजार सतरंजी आणि तीन हजार लुंग्यांचा समावेश आहे. 

या कपड्यांच्या बिलाची रक्कम संबंधित कापड मिल मालकांना देण्याची जबाबदारी राज्य सरकारने के्रडाई संस्थेवर सोपविली आहे. केरळमधील सालेम येथे दोन दिवसात ही मदत पोहोचणार असून तेथील प्रशासकीय अधिकारी मलिक यांच्या वतीने कोची-कन्याकुमारी मार्गावरील कुनामथाई माथरनगर या भागात या कपड्यांचे वितरण केले जाणार आहे. 

अपर जिल्हाधिकारी शिंदे आणि महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत एमएच १९ झेड ४१९० आणि एमएच ०८ एच २४१९ या दोन ट्रकांमधून हे कपडे रवाना झाले. या ट्रकांसोबत राज्य सरकारच्या वतीने एक चमूही रवाना झाला आहे. 

Web Title: Kerala's flood affected areas of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.