मोहोळ : देशाच्या राजकारणात सत्ताबदल होणार परंतु, सत्ता स्थापन करणार्यांना मोठा पश्चात्ताप होईल, असे सांगत यंदाच्या वर्षी खरीप व रब्बीचे पीक चांगले येईल, पाऊसकाळही चांगला असल्याची भाकणूक मोहोळचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र नागनाथ महाराजांच्या यात्रेत नागनाथाचे मानकरी श्री राजेंद्र खर्गे महाराज यांनी केली.मोहोळचे ग्रामदैवत श्री क्षेत्र नागनाथ महाराजांची यात्रा गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. आज सहा मे रोजी असणार्या प्रमुख यात्रेच्या दिवशी ही भाकणूक करण्यात आली. सालाबादप्रमाणे दुपारी चार वाजता नागनाथाचे मानकरी श्री राजेंद्र खर्गे महाराज यांच्या अंगात वायुरुपाने संचार होऊन त्यांच्यासह गणांची मिरवणूक निघते.भरदुपारी उन्हाच्या रखरखीत होणारा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. दुपारी चार वाजता मंदिराच्या प्रमुख दिल्ली दरवाजात देशाच्या कारभाराची भाकणूक होते. यावेळी महाराजांनी सत्तेत बदल होणार हे निित आहे, परंतु जे कोणी सत्ता स्थापन करतील त्यांना कपाळाला हात लावून मोठ्या पात्तापाला सामोरे जावे लागेल, अशी भाकणूक केली.काकडे यांच्या पारावर रोगराईबद्दल झालेल्या भाकणुकीत आरोग्य व रोगराई नसल्याचे सांगितले. शेटे यांच्या पारावर खरीप व रब्बी पिकांच्या भाकणुकीत यंदा खरीप व रब्बीला चांगले दिवस आहेत. पाऊस पुरेसा पडेल, असे सांगण्यात आले.खर्गे तीर्थावर व गुरुशिष्य भेटीत अरुणबुवा मोहोळकर व राजेंद्र खर्गे यांच्या अपूर्व भेटीचा सोहळा पाहण्यासाठी आबालवृद्धांची मोठी गर्दी होती. यावेळी अरुणबुवा मोहोळकर, बबन कुर्डे, अण्णा कुर्डे, शंकर शेटे, राजू वाले यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष बबनराव कांचन, पद्माकर देशमुख, अभिनंदन गुमते, सुरेश घोंगडे, गणपत गरड, विष्णू गायकवाड, दिलीप देशपांडे, रामचंद्र परीट, पोपट कारंजकर, नारायण काळे, बाळासाहेब शिंदे, गोविंद घागरे, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब गायकवाड, आदी उपस्थित होते.
देशात सत्ताबदल होणार खर्गे महाराज यांची भाकणूक; पाऊस व पिके चांगली येणार
By admin | Published: May 06, 2014 8:57 PM