करमाळा : रयतेचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आमच्या शहरात उभारतोय यासारखा आनंदाचा क्षण कोणता. यासाठी खुशी खुशी आम्ही आमचा फूल ना फुलाची पाकळी म्हणून लोकवाटा आनंदाने देण्यास तयार आहोत, असा निर्धार करमाळकरांनी येथील विकी मंगल कार्यालयात आयोजित सर्वपक्षीय, धर्मीय नागरिकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
करमाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी सर्वधर्मीयांचे हजारो हात पुढे आले आहेत. हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा येत्या ६ जून रोजी शिवरायांच्या राज्याभिषेक दिनापूर्वी उभारण्याचा निर्धार येथे या बैठकीत करण्यात आला. या बैठकीस हिंदू, बौद्ध व मुस्लीम धर्मीयांसह सर्व जातीधर्मांचे नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. शहरातील भवानी नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. त्याच्या जागी अश्वारूढ पुतळा उभा करण्याची मागणी शहरातील युवकांनी नगर परिषदेकडे केली होती.
नगर परिषदेने सर्वसाधारण सभेत सर्वानुमते अश्वारूढ पुतळा उभा करण्यास मंजुरी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यासंदर्भात जागेच्रूा निश्चितीपासून लोकवर्गणीपर्यंतच्या सूचना अनेकांनी मांडल्या. हिंदू बांधवांबरोबर बौद्ध, मुस्लीम बांधव, व्यापाऱ्यांपासून कष्टकरी कामगारांनी लोकवर्गणी देण्याची तयारी दर्शविली.
---
छत्रपती सर्वधर्मीयांचे... सर्वधर्मीयांचा सूर
शहरात लोकवर्गणीतून उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या बैठकीत हिंदू बांधवांबरोबरच मुस्लिम, बौद्ध बांधवांनी छत्रपती शिवराय सर्वधर्मीयांचे होते. आपल्या शहरात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारणे गर्वाची गोष्ट आहे. आम्ही लोकवर्गणीत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ. महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारू, असे सांगितले.
फोटो३०करमाळा-छत्रपती
करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात शिवस्मारक समितीच्या बैठकीस उपस्थित सर्वधर्मीय जनसमुदाय.