ऑक्टोबर महिन्यात भीमा नदीला महापूर आल्याने हा पूल तीन दिवस पाण्याखाली गेला होता. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या पृष्ठभागावरील सिमेंटचे आवरण निघाल्याने छोटे-मोठे असंख्य खड्डे पडले होते. त्याचबरोबर पुलाचे संरक्षित लोखंडी बारही तुडून पडल्याने पुलाची अवस्था धोकादायक बनली आहे. दरम्यान, चक्क एक महिला पुलावरून खाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर राष्ट्रीय महामार्गाकडून या खड्ड्यांची डागडुजी केली. मात्र, ती अत्यंत निकृष्ट पद्धतीने करण्यात आले. सध्या या पुलावर असंख्य खड्डे पडले आहेत.
या पुलावरून जाताना दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून पूल ओलांडावा लागत आहे. इतके खड्डे पडूनही राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते हे गांधारीच्या भूमिकेतच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.