यावेळी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे उपस्थित होते. प्रारंभी संस्थापक चेअरमन स्व. वसंतराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या कीर्तन सोहळ्यामध्ये ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कावडे, ह.भ.प. शक्ती महाराज चव्हाण, ह.भ.प. भक्ती महाराज देठे, ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास, ह.भ.प. प्रदीप महाराज ढेरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पवार, ह.भ.प. एकनाथ महाराज चौगुले यांनी कीर्तन सेवा बजावली. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. व्यवस्थापक म्हणून कारखान्याचे माजी संचालक शहाजी पासले, संचालक भारत कोळेकर व ह.भ.प. धनंजय महाराज गुरव यांनी काम पाहिले.
याप्रसंगी माजी उपाध्यक्ष मारुती भोसले, संचालिका मालनबाई काळे, संगीता काळे, संचालक मोहन नागटिळक, बाळासाहेब कौलगे, भारत कोळेकर, राजाराम पाटील, ॲड. तानाजी सरदार, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, योगेश ताड, युवराज दगडे, इब्राहिम मुजावर, अरुण बागल, नागेश फाटे, माजी संचालक शहाजी पासले, राजसिंग माने, संभाजी बागल, तानाजी जाधव, तुकाराम माने, कार्यकारी संचालक प्रदिप रणनवरे, नानासाहेब काळे, डी. डी. काळे उपस्थित होते. (वा.प्र.)