पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच झाली. या रणधुमाळीत अनेक कार्यकर्ते कोरोनाबाधित ठरले. तर निवडणूक ड्युटी बजावणारे प्राथमिक शिक्षकही कोरोनाच्या तडाख्यात सापडले. यामुळे तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सरसावली आहे.
यामध्ये शिक्षक नेते सुरेश पवार, संजय चेळेकर, श्रीमंत पाटील, सिध्देश्वर धसाडे, चंद्रकांत पवार, विठ्ठल ताटे, सिद्धेश्वर सावंत, संभाजी तानगावडे, भाऊसाहेब माने, धनंजय लेंडवे, संजय बिदरकर, दत्तात्रय येडवे, शाम सरगर, पांडुरंग शिंदे, आप्पाराया न्यामगोंडे, रवींद्र लोकरे, उमेश कांबळे, राजेंद्र कांबळे, जमीर शेख, संभाजी सुळकुंडे, भारत शिंदे, मारुती दवले, भगवान चौगुले, बाळासाहेब जाधव, जितेंद्र कांबळे, सूर्यकांत जाधव, गिरीश जाधव, संतोष पवार, अनिल दत्तू, अमित भोरकडे, संतोष लाड, सुभाष साळसकर, ज्ञानेश्वर घोडके, मंगेश मोरे, ज्योती कलुबर्मे, मंगल बनसोडे, अनिता भिंगे यांनी सहभाग नोंदविला.