कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अत्यावश्यक सेवेतील मतदारांना मतदान करता यावे, यासाठी ४८ क्षेत्रिय अधिकारी, सहायकांची नेमणूक केली आहे. संबंधित अधिकारी मतदारयादीतील पत्त्यावर जाऊन टपाल मतपत्रिकेव्दारे मतदान घेऊन त्याच दिवशी अहवाल सादर करणार आहेत. ज्या मतदारांची उपरोक्त दिनांकास भेट झाली नसल्यास त्यांना १५ एप्रिल रोजी मतदान करता येणार असल्याचे बेल्हेकर यांनी सांगितले.
टपाली मतदान नोंदणीसाठी १३ एप्रिल रोजी कौठाळी, इसबावी, वाखरी गादेगाव, कोर्टी, बोहाळी, उंबरगाव, टाकळी, पंढरपूर, मुंढेवाडी, कासेगाव, खर्डी, शेटफळ, तनाळी, तावशी, चिचुंबे, सिद्धेवाडी, अनवली, रांझणी, ममदाबाद शे., गुजगाव, मल्लेवाडी, धर्मगाव, उचेठाण, बठाण, मंगळवेढा, अकोले, शेलेवाडी, आंधळगाव, कचरेवाडी, मुढेवाडी, माचणूर, तामदर्डी, तांडोरा, सिद्धापूर, फटेवाडी, खोमनाळी, हिवरगाव, डोंगरगाव, पाटकळ, लेंढवे-चिंचाळे, शिरसी, गोणेवाडी, हाजापूर, भाळवणी, तळसंगी, मरवडे, लमाणतांडा, हुलजंती येड्राव, जलीहाळ, नंदेश्वर, भोसे, रड्डे, चिकलगी, बावची, येळगी, सोड्डी, लवंगी, मारोळी, रवेवाडी, ममदाबाद हु. या गावांमध्ये टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करणार आहेत.
१४ एप्रिल रोजी कौठाळी, शिरढोण, इसबावी, वाखरी, गादेगाव, कोर्टी, बोहाळी, उंबरगाव, टाकळी, पंढरपूर, गोपाळपूर, कासेगाव, खर्डी, शेटफळ, तनाळी, तावशी, एकलासपूर, अनवली, शिरगाव, तरटगाव, कासेगाव, गुंजेगाव, मारापूर, घरनिकी, ब्रह्मपुरी, मंगळवेढा, लक्ष्मीदहिवडी, आंधळगाव, कचरेवाडी, रहाटेवाडी, आरळी, नंदूर, डोणज, भालेवाडी, डोंगरगाव, पाटखळ, गणेशवाडी, लेंडवे-चिंचाळे, खुपसंगी, जुनोनी, मेटकलवाडी, तळसंगी, डिकसळ, कात्राळ, खवे, जिंती, निंबोणी, सिद्धनकेरी, खडकी, नंदेश्वर, भोसे, रड्डे, शिवनगी, आसबेवाडी, सलगर खु, सलगर बु., शिरनांदगी, हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी या गावांतील भागामध्ये टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करण्यात येणार असल्याचेही बेल्हेकर यांनी सांगितले.