हृदयविकारग्रस्त पतीच्या उपचारासाठी अनवाणी पायाने बारामती मॅरेथॉन धावणाऱ्या लता भगवान करे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासही अंध प्रशांत महामुनी यांनी संगीत दिले होते. तसेच या चित्रपटासाठी गिरिजा महामुनी हिने गीतगायन केले आहे. यंदा या चित्रपटास विशेष राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या जोडगोळीने आता अनोख्या पद्धतीने कृष्ण भजन लोकांसमोर आणण्यासाठी धडपड चालवली आहे. मिया मल्हार राग व अर्धा त्रितालात हे भजन बनविले आहे. तर बारामती येथील तेजश्री मोरे हिने यात कथ्थक नृत्याद्वारे अभिनय केला आहे. माळीनगर येथे गीताचे छायाचित्रण केले आहे. ‘टी’ सिरीज कंपनीने या गीतांचे हक्क आपल्याकडे घेतले असून, दोन दिवसांपूर्वी महामुनी यांच्याशी करारही झाला आहे.
कोट :
आजच्या पाॅप व डीजेच्या जमान्यात वेगळे काहीतरी करण्याची मनापासून इच्छा होती. शास्त्रीय संगीतावर आधारित कृष्णभजन लोकांना निश्चित आवडेल, अशी आशा आहे.
- प्रशांत महामुनी
गीतकार व संगीतकार
कोट ::
या गीताची बॉलिवूडमधील ‘टी’ सिरीज कंपनीने दखल घेतल्याचा आनंद आहे. आम्हा सर्वांच्या परिश्रमाचे चीज झाले आहे. स्थानिक व ग्रामीण कलाकारांच्या मदतीने बनलेली ही छोटीशी कलाकृती नक्कीच सर्वांना आनंद देईल.
-गिरिजा महामुनी
गायिका