कोल्हापूर : कॉँग्रेस-राष्टÑवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांची निवडणुकीत आघाडी घेतल्याची बातमी शहरात सकाळी दहापासून पसरली अन् मोटारसायकलवरून तरुणांचे लोंढे हातात राष्टÑवादीचा झेंडा घेऊन गुलालाची उधळण करीत फिरू लागले. ‘कुठंबी हुडीक, मुन्ना महाडिक’ अशा घोषणांनी शहराचा कोपरान्कोपरा दणाणला. ताराराणी चौकात गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा ठेका धरत जल्लोष केला. गेली महिनाभर सुरू असलेली लोकसभा निवडणुकीची धाकधूक आज संपुष्टात आली. सकाळी नऊ वाजता धनंजय महाडिक यांनी पहिल्या फेरीअखेर बारा हजारांची आघाडी घेतल्याची बातमी शहरात वार्यासारखी पसरली. तरुणांचे लोंढे मोटारसायकलवरून गुलालाची उधळण करीत, हातात राष्टÑवादीचा झेंडा घेऊन महाडिक यांच्या ताराराणी चौकातील पेट्रोलपंपावर जमू लागले. मतदान फेर्यांतून महाडिक यांच्या आघाडीच्या बातम्या बाहेर पडू लागल्या, तसा तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहू लागला. हजारोंच्या संख्येने जमलेल्या तरुणांनी पेट्रोल पंपावर डॉल्बीच्या दणदणाटावर ठेका धरला. गुलालाची उधळण करीत तरुणाई थिरकत होती. ‘महाडिक साहेबांचा विजय असो’च्या घोषणांची आरोळी देत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास महाडिक यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच, तरुणांचा मोठा गट ताराराणी चौकात आला. ‘मैं हॅूँ डॉन’च्या ठेक्यावर त्यांची पावले थिरकत होती. शहरात रात्री उशिरापर्यंत तरुणाईचा जल्लोष सुरू होता. (प्रतिनिधी)
कुठंबी हुडीक, मुन्ना महाडिक..! कार्यकर्त्यांचा जल्लोष : स्टेशन रोडवर मोटारसायकलींचे लोंढे
By admin | Published: May 17, 2014 12:40 AM