कुर्डूवाडी उपविभागाअंतर्गत कुर्डूवाडी शहर, कुर्डूवाडी ग्रामीण- १ व कुर्डूवाडी ग्रामीण २ असे भाग आहेत. यापैकी कुर्डूवाडी शहरामध्ये कुर्डूवाडी, आकुलगाव, लहू असे तर कुर्डूवाडी भाग -१ मध्ये बावी, लऊळ, कुर्डू, अंबाड, शिराळ, पडसाळी, भुताष्टे, पिंपळखुंटे, शेडसिंगे, उजनी, जाखले, भोगेवाडी, चौभे पिंपरी, ढवळस या गावांचा समावेश होत आहे. कुर्डूवाडी ग्रामीण भाग-२ अंतर्गत भोसरे, बारलोणी, चिंचगाव, म्हैसगाव, रोपळे, कव्हे, घाटणे, वडशिंगे, तांदूळवाडी, पापनस, तडवळे, रिधोरे, मुंगसी, बिटरगाव, शिंगेवाडी, नाडी, लोणी, महादेववाडी, गवळेवाडी, वडाचीवाडी अशी गावे आहेत.
यामध्ये कुर्डूवाडी शहरातील २ हजार २९३ ग्राहकांकडे २ कोटी ३५ लाख ४१ हजार रुपये थकबाकी आहे.
कुर्डूवाडी ग्रामीण भाग-१ मधील १ हजार ४५२ ग्राहकांकडे ७८ लाख ८९ हजार थकबाकी आहे व कुर्डूवाडी ग्रामीण भाग -२ मधील १ हजार ७५२ ग्राहकांकडे सुमारे ६९ लाख ६२ हजार थकबाकी आहे. ४८७ व्यापारी ग्राहकांकडे ७५ लाख ९९ हजार थकबाकी असून, १११ औद्योगिक ग्राहकांकडे २९ लाख ५० हजार थकबाकी आहे. ४ हजार ९२५ घरगुती ग्राहकांकडे २ कोटी ९० लाख इतकी थकबाकी आहे. शेतीपंपाचे एकूण ग्राहक १३ हजार ६७२ असून, त्यांच्याकडे सप्टेंबर २०२० पर्यंत सुमारे २१८ कोटी ४८ लाख थकबाकी आहे. कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊन थकबाकी जमा करण्याचे आवाहन महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता उत्तम कानगुडे यांनी केले आहे.