नळदुर्गचा नर मादी धबधबा सुरू झाल्याने बोरी नदीच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असून, धरणाची वाटचाल ही ५० टक्क्यांपुढे सुरू झाली आहे. हे धरण दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात भरते. परंतु, यावर्षी जुलैच्या महिन्याच्या शेवटी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षीदेखील तशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. हे धरण जुलैच्या शेवटी ५० टक्के भरत आहे. पाऊस असाच कायम राहिल्यास लवकरच धरण भरेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पावसाळा संपेपर्यंत खबरदारी घेण्याची गरज आहे.
----
इतिहासात प्रथमच...
कुरनूर धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच जुलैमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतक-यातून समाधान व्यक्त होत आहे. या धरणावर हजारो शेतक-यांची पाईपलाईन अवलंबून आहे. तीन नगरपालिकांसह ५१ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या पाण्यामुळे तूर्तास तरी सर्वांचा पाणीप्रश्न मिटला आहे.
------
चपळगाव मंडलात २४० टक्के पाऊस
दरम्यान, यावर्षीच्या पावसाने चपळगाव मंडलातील सरासरी ओलांडली आहे. आजपर्यंत सरासरीच्या १७२ टक्के पाऊस एकट्या चपळगाव मंडलात बरसला आहे. जून महिन्यात सरासरीच्या ११३ टक्के हजेरी लावलेल्या पावसाने जुलै महिन्यात चपळगाव मंडलात सरासरीच्या २३२ टक्के हजेरी लावली आहे. यामुळे प्रथमच जुलै महिन्यात या भागातील ओढे, नाले, नद्या प्रवाहीत झाले आहेत. अती पावसाने खरीप पिकांना मात्र फटका बसला आहे.
---
फोटो : २६ कुरनूर
जिल्ह्यातील पावसाने कुरनूर धरण ५१ टक्के भरलेले दृश्य
260721\fb_img_1602038839089.jpg
सोलापूर जिल्ह्यातील पावसाने कुरनूर धरणात पाणीसाठा वाढत असल्याचे छायाचित्र..