तत्कालीन मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने हत्तरसंग कुडल येथील श्री संगमेश्वर देवस्थान परिसर सुधारणा करण्यासाठी दोन कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. यातील वाहनतळ, यात्री निवासासमोरील परिसरात पेव्हरब्लॉक बसवणे आणि पथदिवे बसविण्याच्या कामासाठी ८६ लाख खर्च करण्यात आले आहेत. काम पूर्ण झाले आहे.
तीर्थक्षेत्र विकास योजनेतून उपलब्ध झालेल्या निधीतून आणखी कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे संरक्षक भिंत ४० लाख, दोन मोठी स्वच्छतागृहे ४२ लाख ही कामे प्रलंबित आहेत. मंजुरीनंतर ती तातडीने हाती घेण्यात आली नव्हती. उशिराने निविदा प्रक्रिया झाली अन् कोविडच्या नावाखाली कामे थांबवण्यात आली. वर्ष उलटून गेले तरीही या कामाची सुरुवात झाली नाही.
-----
हत्तरसंग कुडल येथील देवस्थान परिसर सुधारण्यासाठी मिळालेल्या निधीचा पुरेपूर वापर व्हावा. कोविडच्या नावाखाली
निधी अन्यत्र वळवण्यात येऊ नये, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
-
मधुकर बिराजदार, विश्वस्त,
श्री संगमेश्वर देवस्थान परिसर सुधारणा समिती, हत्तरसंग-कुडल.
---