सोलापूर : रेस्क्यू नाग निसर्गात मुक्त करताना चतूर (हेलिकॉफ्टर) पक्षाचे लॅडिंग झाल्याचा एक अविस्मरणीय घटनेचा गुरूवारी हसरा अनुभव पाहण्यास मिळाला.
दरम्यान, १ सप्टेंबर २०२२ रोजी सोनी नगर हुडको परिसरात समर्थ मचाले ह्यांच्या घरी साप असल्याची माहिती वन्यजीव प्रेमी प्रविण जेऊरे ह्यांना मिळाली होती. त्यानंतर तात्काळ घटनास्थळी जेऊरे, तेजस म्हेत्रे, संकेत माने पोहचले. घरात शोध घेतले असता विषारी प्रजातीचा नाग आढळुन आला. सुरक्षित साधनाचा वापर करून नागास सुखरूप पकडण्यात आले. त्यानंतर नागास नैसर्गिक अधिवासात सोडताना नागाने भरणीतून बाहेर येताच फणा काढुन उभा राहिला. फणा डोलवत असताना अचानक एक चतुर उडत आले व थेट नागाच्या फण्यावर येऊन बसले. हा विनोदी क्षण लगेच जेऊरे ह्यांनी कॅमेरात टिपला. या क्षणचा व्हिडिओ काढला आहे. तो सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे पक्षीमित्र मुकूंद शेटे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.