कुरूल येथील मारुती मंदिरात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांची पहिली बैठक पार पडली. निवडणुकीमुळे गावात भावकीत तंटा, वादविवाद होतात. कटुता निर्माण होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे मत प्रमोद जाधव यांनी व्यक्त केले. बिनविरोधसाठी त्यांनी रोख १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले व ती रक्कम ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी सत्ताधारी गटाचे प्रमुख जालिंदर लांडे, विरोधी गटाचे प्रमुख लिंगदेव निकम, प्राचार्य निवृत्ती पवार, बाबासाहेब जाधव, लक्ष्मण पाटील, आनंद जाधव, गहिनीनाथ जाधव, माणिक पाटील, अरुण जाधव, श्रीपती डुणे, विजय भालेराव, सुनील आंबरे यांनी बिनविरोध निवडीसाठी वेगवेगळ्या सूचना केल्या. मात्र सत्ताधारी आणि विरोधी गटप्रमुखांची विकासकामांच्या दर्जाबाबत शाब्दिक चकमक झाली. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
भीमा कारखान्याचे संचालक चंद्रसेन जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष छत्रपती जाधव, माजी उपसरपंच प्रकाश पाटील, मोहोळ नागरी पतसंस्थेचे संचालक पंडित निकम यांसह पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबात पुन्हा २४ व २९ डिसेंबर रोजी बैठक घेण्याचे ठरवले.