अधिक माहिती अशी की, आरोपी दत्ता भीमराव जाधव, गणेश रमेश चव्हाण (दोघे रा. सलगर वस्ती सोलापूर), विकास जाधव (रा. रामवाडी सोलापूर) या तिघांनी मिळून रमाकांत नरहरीराव घनाते या नावाने बनावट पासबुक, सही, शिक्का, तयार करून आवक, जावक नोंदी वगैरे सर्व काही बनावट पद्धतीने तयार करून ही रक्कम खात्यातून काढून घेतली. यात खातेदार कलावती शिवाजी जाधव यांचे ९ फेब्रुवारी रोजी २४ हजार ३०० रुपये, ओमप्रकाश बाबूलाल राठोड यांचे १२ फेब्रुवारी रोजी २४ हजार, सुलोचना विठ्ठलराव अंबुरे यांचे ९ फेब्रुवारी रोजी २४ हजार, सबला कल्याणी टेंगळे यांचे १२ फेब्रुवारी रोजी ३० हजार रुपये असे १ लाख ५ हजार रुपये आरोपींनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अक्कलकोट येथून काढून पसार झालेले आहेत.
याबाबत शाखाधिकारी मादिंगा पार्वतप्पा नागाराजू यांनी फिर्याद दिली आहे.
सर्व आरोपींना सपोनि देवेंद्र राठोड यांनी कसून तपासणी करून अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता, सुरुवातीला पोलीस कोठडी दिली होती. त्या नंतर त्या सर्व आरोपितांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर घटना खातेदार रक्कम काढण्यासाठी आले असता, बँक खात्यात रक्कम नसल्याचे लक्षात आले. तेव्हा या बाबीचा उलगडा झाला. या घटनेने खातेदारामधून चिंता व्यक्त होत आहे. अधिक तपास सपोनि राठोड हे करीत आहेत.
----