पंढरपूर : लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील जगदंबा नगरमधील एक घर फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम लिंगप्पा पाटील (रा. लक्ष्मीटाकळी, ता. पंढरपूर) हे कुटुंबातील सदस्यासह २० जानेवारीला बेळगावला गेले होते. यावेळी त्यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि १ तोळे सोन्याचे नेकलेस, दीड तोळ्याचे कानातील झुबे, साखळ्या चार जोड, अर्धा तोळ्याचे कानातील सोन्याचे दोन वेल, तीन ग्रॅम वजनाचे दोन गणपती, तीन ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या रिंगा, देवघरातील चांदीच्या गणपतीची व लक्ष्मीची मूर्ती, कुकुंवाचा करंडा, लहान मुलांचे पैजन, ५० हजार रोख रक्कम व १५ हजार किमतीचा एलईडी टीव्ही असा एकूण २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल पळवून नेला. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झला आहे. तपास पोलीस नाईक बापू मोरे करीत आहेत.
----