अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व २०२१ चा हिंदी दिवस कार्यक्रम ऑनलाईन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी तंत्रज्ञान व हिंदी विषयाचे विद्यार्थी या विषयावर बोलताना तंत्रज्ञानाच्या विविध माध्यमांची माहिती दिली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य दत्तात्रय बागडे होते.
प्रास्ताविक प्रा. निवृत्ती लोखंडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अपर्णा कुचेकर यांनी केले. यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या ऑनलाईन कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, धर्मशाला (हिमाचल प्रदेश), केरळ, गुरूदासपूर व मोगा (पंजाब), दिल्ली, पंजाब नॅशनल बँकेचे अधिकारी यांच्यासह महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांतील एकूण ११५ प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते. यासाठी सलीम शेख, डॉ. अण्णासाहेब नलवडे, प्रा. शिवाजी राजगुरू, नितीन सुरवसे यांनी परिश्रम घेतले.