सोलापूर : कोरोना संसर्गामुळे शासनाला शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे मुलांना ऑनलाइनशिक्षण देण्याचा सर्वत्र पुकारा होत असताना, शिवाय प्रत्यक्षात या प्रकारचे शिक्षण सुरूही झाले असताना पालकांना मात्र आपल्या लहानग्यांच्या डोळ्यांची चिंता सतावत आहे.
यामुळे त्यांचे डोळे खराब तर होणार नाहीत ना? या भीतीने बाजारपेठेत लॅपटॉप, संगणकाची मागणी वाढत आहे. पण चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे या दोन्हींच्या किमती वाढल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी मीटिंग अॅप, व्हिडिओ क्लिप्स अन् व्हाईस रेकॉर्डिंगसारख्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे लॅपटॉप अन् कॉम्प्युटर्सही महागले.
ऑनलाइन शिक्षणासाठी साधारणपणे पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना सकाळी आठ ते नऊ, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना सकाळी नऊ ते १० तर पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी एक अशी वेळ ठरविण्यात आली आहे. वेगवेगळ्या अॅपद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे शक्य झाले आहे. बहुतांश घरी आॅनलाईन अभ्यासासाठी मुले आईचाच मोबाईल वापरतात.
गणिताच्या धड्यासाठी रिअर कॅमेºयाचे सोल्युशनबहुतांश सगळ्या विषयांसाठी फक्त फ्रंट (समोरचा) कॅमेरा वापरला जातो. गणित विषय हा प्रात्यक्षिक करूनच शिकवावा लागतो. यासाठी शिक्षकांतर्फे रिअर (मागचा) कॅमेºयाचा वापर करण्यात येत आहे. गणितातील एखादी संकल्पना समजावून सांगताना समोरच्या कॅमेºयात पाहून सांगण्यात येते, तर गणित सोडविताना वहीवर मोबाईलच्या मागील कॅमेºयाचा वापर करून गणित समजावून सांगतिले जात आहे.
शैक्षणिक संस्था सुरू करण्यास अडचणी येत असल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय अवलंबण्यात येत आहे. यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम (मोबाईलकडे पाहण्याचा कालावधी) वाढत आहे. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. कॉम्प्युटर व मोबाईलमधून ‘ब्लू रे’ आणि ‘शॉर्ट वेव लेंथ’ची किरणे डोळ्यांवर विपरीत परिणाम करतात. तसेच डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी झाल्याने डोळे कोरडे पडतात. हे टाळण्यासाठी ‘ब्लू ब्लॉकिंग’चा विशिष्ट असा चष्मा घालावा. स्क्रीन पाहताना डोळ्यांची उघडझाप करावी, स्क्रीन डोळ्यांच्या खालच्या पातळीवर असावी, अक्षरांचा फाँट मोठा असावा, डोळ्यांची जळजळ होत असल्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा. - डॉ. उमा प्रधान, नेत्ररोग तज्ज्ञ
शिक्षक व्हॉट्सअॅपवर पाठवतात व्हिडिओकोरोना आजार येण्याच्या आधीपासूनच अनेक शिक्षक हे तंत्रस्नेही झाले आहेत. त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग आता विद्यार्थ्यांना होत आहे. पाठासंबंधीची माहिती स्वत: कॅमेºयासमोर थांबून शूट केले जाते. हा व्हिडिओ तयार करून पालकांच्या मोबाईलवर पाठविण्यात येतो. एखादा भाग समजला नसल्यास विद्यार्थी हे पुन्हा व्हिडिओ पाहतात. यासोबतच यूट्यूबवर आधीपासूनच व्हिडिओ तयार असून, गरजेप्रमाणे विद्यार्थ्यांना त्याची लिंक पाठविण्यात येते.
स्मार्टफोन नसणाºया विद्यार्थ्यांचे काय?वर्गात शिकविण्यापेक्षा जास्त चांगला पर्याय असू शकत नाही. सध्या कोरोनामुळे अशी वेळ आल्याने आॅनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही, अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे अभ्यासाच्या सूचना देण्यात येतात. एखाद्या दिवशी कोणता धडा शिकवून झाला याची माहिती स्मार्टफोन असणारे विद्यार्थी इतर मित्रांना देतात. घरचा अभ्यास दिल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेळी तपासण्यासाठी बोलावले जाते.