सोलापूर : दिवाळीमध्ये प्रत्येकजण खरेदीच्या मूडमध्ये असतो. खरेदी - विक्रीसाठी हा काळ अतिशय पोषक असल्यामुळे परराज्यातील विक्रेत्यांनी सोलापुरात येऊन पदपथांवर मार्केट थाटलं आहे. विशेष म्हणजे सोलापूरकरांचा त्यांना उत्तम प्रतिसादही लाभत आहे. रंगभवन चौकातील प्रत्येक फुटपाथवर स्वयंपाक घरात वापराच्या प्रत्येक वस्तू उपलब्ध आहेत. शिवाय विविध रंगी रांगोळी, पणत्या आणि आकाशदिव्यांमुळे फूटपाथ अगदी फुलून गेले आहे.
रंगभवन येथील फुटपाथवर मध्यप्रदेशचे आठ ते दहा व्यापारी घरगुती तवा, खलबत्ता, टोपली या साहित्यांची विक्री आहेत. दिवसाला एका व्यापाºयाची दोन ते तीन हजार रुपयांची विक्री होत असल्याचे बाला बदरी (रा. मध्यप्रदेश ) यांनी सांगितले.
दुकाने जशी सजलेली आणि गर्दीने भरलेली आहेत. तशीच रस्तोरस्तीच्या पदपथांवर छोट्या विके्रत्यांनी दिवाळीसाठी अनेक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. पारंपरिक स्वरूपाचे आकाश कंदिलही सातरस्ता, आसरा परिसरात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
सोलापुरात समाधानकारक व्यापार !- मध्यप्रदेशचे व्यापारी बाला बदरी यांनी सांगितले, आम्ही दिवाळीपूर्वी विक्रीसाठी विविध राज्यात जातो. सोलापुरात व्यापार चांगला असल्याचे आम्हाला कळाले. त्यामुळे यंदा आम्ही इथे आलो आहोत. गेल्या ८ ते १० दिवसांमध्ये या शहरात समाधानकारक व्यापार होत आहे. त्यामुळे आमचे इथे येणे फलदायी ठरत आहे.