सुजल पाटील ।
सोलापूर : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ यंदाच्या वर्षात नऊ महिन्यात तब्बल ४५९ जणांनी लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे़ भूमी अभिलेख, अभिलेख, नोंदणी कार्यालयातील अधिकारी सर्वाधिक लाचखोर निघाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठांनी राज्यातील एसीबीच्या सर्वच अधिकाऱ्यांना नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीवर निर्णय घेणे सक्तीचे केले आहे. एसीबीच्या कारवाईसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, हे ओळखून टोल फी क्रमांक, आॅनलाइन तक्रारी घेणे सुरू केले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युनिटला दोन मोबाइल दूरध्वनी क्रमांक, व्हॉटसअप नंबर जनतेच्या संपर्कासाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे नागरिकांना लाचखोरांविरूध्द तक्रार करणे सुलभ झाल्याने तक्रारीत वाढ झाली़लाच घेण्यात महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी कार्यालये आघाडीवर असून त्याखालोखाल पोलीस, पंचायत समिती, वनविभाग, महानगरपालिका, नगरपरिषद खात्याचा नंबर लागतो़विभागनिहाय लाचखोरांची संख्याविभाग गुन्हे आरोपीपुणे १०६ १५३नाशिक ६७ ८३अमरावती ६६ ९०नागपूर ६३ ८१औरंगाबाद ५८ ८१नांदेड ५७ ८०ठाणे ३२ ५०मुंबई १० १६लॉकडाऊनमुळे लाचखोर घटले़़़च्कोरोनामुळे राज्यात मार्चपासून लॉकडाऊन पुकारण्यात आला होता, त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते़ या काळात मार्च - ५८, एप्रिल ०७, मे ३०, जून ६४, जुलै ५६, आॅगस्ट ४८ तर सप्टेंबर महिन्यात ५६ लाचखोर जाळ्यात सापडले आहेत़