सचिन कांबळे, पंढरपूर : अंतरावली (ता. अंबड, जिल्हा जालना) येथे आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील महिला, लहान मुले, वयस्कर व तरुणावर पोलिसांनी लाठीहल्ला व गोळीबार केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन केले.
अंतरावली (ता. अंबड, जिल्हा जालना) या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या मावळ्याने २९ ऑगस्ट पासून चालू केलेले. बेमुदत आमरण उपोषण उधळून लावण्यासाठी पोलिसाच्या प्रचंड मोठा फौज फाटा आला होता. हे आंदोलन चिरडून काढण्यासाठी पोलिसांनी मराठा समाजातील आंदोलन कर्त्यावर लाठीहल्ला व गोळीबार केला आहे. जगाला आंदोलनाची दिशा देणाऱ्या मराठा समाजावर हल्ला केल्याबद्दल या सरकारचा पंढरपुरातील मराठा समाजाने जाहीर निषेध केला.
यावेळी श्री विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, मनसे नेते दिलीप धोत्रे, बीआरएसचे भगीरथ भालके, राष्ट्रवादीचे नागेश फाटे, मोहन अनपट, सुनील पाटील, संदीप मांडवे, सुभाष भोसले, विनोद लटके, तानाजी मोरे, रामभाऊ गायकवाड, अमोल आटकळे, विजय काळे, समाधान गाजरे, सुमित शिंदे उपस्थित होते.