नगरपरिषदेच्या जवाहर हॉस्पिटल प्रियदर्शिनी इमारतीमध्ये सुविधा आयसीयू ॲन्ड कॅथलॅब सेंटरच्या सहकार्यातून बार्शी कोविड हेल्थ केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र राऊत हे होते. सोमवारी सायंकाळी हा उपक्रम पार पडला. बार्शीतील हे पाचवे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर आहे.
यावेळी तहसीलदार सुनील शेरखाने, नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, रावसाहेब मनगिरे, डॉ. अशोक ढगे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रकाश बुरगुटे, डॉ. कैवल्य गायकवाड, डॉ. अजित आव्हाड, डॉ. वैभव मोराळे, नितीन आवटे, नगरसेवक दीपक राऊत, कय्युम पटेल, विजय चव्हाण, ॲड. महेश जगताप, संतोष बारंगुळे आदी उपस्थित होते.
राजेंद्र राऊत म्हणाले, अचानक आलेल्या लाटेमुळे सर्वांना त्रास झाला. दीड महिन्यात रुग्णसंख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्वसामान्यांच्या सोयीसाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यामुळे आठ ते दहा तालुक्यांतील रुग्णांची सोय होणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाची भूमिका घेतल्याने कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न झाला आहे.
----
सर्वसामान्यांची सोय
कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य झाल्याने ३० बेडच्या आयसीयूसह ५० बेडची, दोन व्हेंटिलेटर्स, ६ बायपॅक मशिन्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सोय उपलब्ध केली आहे. या सर्व सेवा रुग्णांना परवडेल अशा दरात उपलब्ध करत आहोत. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दर असल्याने सर्वसामान्यांची सोय झाली आहे, अशी माहिती डॉ. प्रकाश बुरगुटे यांनी दिली.
----
-----
===Photopath===
250521\img-20210525-wa0018.jpg
===Caption===
बार्शीत कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन