सांगोला : नॅशनल वाॅटर अवाॅर्ड विजेत्या महूद गावाने आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपणाने माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ झाला.
महूदच्या समग्र ग्रामविकासासाठी कासाळगंगा फाउंडेशनचे ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री ऋतुजा बागवे असतील, अशी घोषणा डाॅ. सिंह यांनी केली.
माॅडेल व्हिलेजच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी महूदच्या सरपंच संजीवनी लुबाळ यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी महाविद्यालयात झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीवेळी माझी वसुंधरा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला.
दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत याबाबत पहिली बैठक झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीसाठी डाॅ. सिंह, चिन्मय, ऋतुजा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकांदे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, यशदाचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी सुमंत पांडे, अग्रणी नदी पुनर्जीवनाचे समन्वयक नरेंद्र चुग, नमामि गोदा फाऊंडेशनचे प्रमुख राजेश पंडित, आदिनाथ ढाकणे, उपसरपंच महादेव येळे उपस्थित होते.
--
फोटो : १८ महूद
महूद-वसुंधरा अभियान राबवण्यासह माॅडेल व्हिलेजच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महूद ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधताना आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र सिंह.