या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत देशभरात प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. यात पोषण, आहार, आरोग्य, लसीकरण, स्तनपान इत्यादीबाबत विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जाते. यामध्ये रॅली, पथनाट्य, वेबिनार, व्याख्यान, पोषण स्पर्धा, पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा इत्यादी माध्यमातून पोषणबाबत जनजागृती केली जाते. या वर्षीसुद्धा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याला सीईओ दिलीप स्वामी यांनी दशसूत्रीची जोड दिली आहे.
कोरोना नियमांचे पालन करून तालुकावासीयांनी पोषण महिना कार्यक्रमात सहभाग नोंदवण्याचे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, बालाजी आल्लडवाड यांनी केले आहे. या वेळी सुपरवायझर बी.ए. कुलकर्णी, विस्तार अधिकारी मृणालिनी शिंदे आदी उपस्थित होते.
---- ०३अक्कलकोट-हालचिंचोळी
हालचिंचोळी (ता. अक्कलकोट) येथे पोषण आहार दशसूत्री अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बालाजी आल्लडवाड.