त्यानंतर समर्पण निधी जमा करण्यास सुरुवात झाली असून, त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यावेळी दिनकर सापनाईकर यांनी २५ हजार, हरिष कुलकर्णी यांनी ११ हजार, श्री कार्पोरेशन, बापू रोहिणकर यांनी प्रत्येकी ५ हजार रुपये धनादेशाद्वारे जमा केले. तसेच रोख स्वरुपातही रक्कम जमा करणे सुरू आहे.
यासाठी रा. स्व. संघाचे तालुका कार्यवाह मोहन श्रीरामे, सहकार्यवाह तुषार महाजन, ज्येष्ठ स्वयंसेवक पी. व्ही. कुलकर्णी, व्ही. एस. कुलकर्णी, सुरेश हालमे, राजन बंडेवार, अनिल खजानदार, सूर्यकांत देशमुख, जितेंद्र मोरे, सुधाकर नारकर, गजानन कुलकर्णी, व्यंकटेश कुलकर्णी, अस्मित कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. शहर व तालुक्यातील विविध भागात निधी समर्पण अभियानाचे काम दररोज महिनाभर चालणार आहे. तरी श्रीराम भक्तांनी यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन न्यासातर्फे करण्यात आले आहे.
फोटो
१६बार्शी०१
बार्शी येथे न्यासामार्फत श्रीराम जन्मभूमी येथे मंदिर निर्माण करण्याच्या कार्यासाठी समर्पण निधी संकलन कार्यक्रमाच्या प्रारंभप्रसंगी रा. स्व. संघाचे तालुका कार्यवाह मोहन श्रीरामे, सहकार्यवाह तुषार महाजन, ज्येष्ठ स्वयंसेवक पी. व्ही. कुलकर्णी आदी.