सोलापूर: महापालिकेला एप्रिल महिन्यात १० कोटी तर चालू महिन्यात ५ कोटी असा सुमारे १५ कोटींचा एलबीटी मिळाला असून एस्कॉर्ट आणि एलबीटीचे उत्पन्न २० कोटी मिळाले असल्याची माहिती मनपाच्या सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी सांगितले़ एलबीटी वसुली सुरळीत व्हावी यासाठी विविध सुविधा सुरू केल्या आहेत़ आॅनलाईन एलबीटी नोंदणी, आॅनलॉईन रिटर्न भरण्याची सुविधा, पैसे भरण्याची सुविधा केली जात आहे़ यंदाच्या वर्षी देखील एलबीटी वसुलीकडे विशेष लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले़ मनपाच्या १७ विभागांकडून वर्षभरात संपलेल्या आर्थिक वर्षात ३०४ कोटी ३५ लाख ८३ हजार ६११ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे़ यामध्ये एलबीटी आणि एस्कॉर्टचे उत्पन्न सर्वाधिक म्हणजे १७० कोटी १९ लाख आहे़ गेल्या वर्षीचे एकूण उत्पन्न २०८ कोटी ८८ लाख होते़ यंदाच्या वर्षीच्या उत्पन्नाशी तुलना करता ९६ कोटींनी हे उत्पन्न वाढले आहे़ सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी आयुक्तांनी आपल्या अंदाजपत्रकात एलबीटी आणि एस्कॉर्टमधून १९० कोटींचा वार्षिक इष्टांक ठेवला आहे़
---------------
३०४ कोटींचे उत्पन्न मनपाच्या १७ विभागांकडून वर्षभरात संपलेल्या आर्थिक वर्षात ३०४ कोटी ३५ लाख ८३ हजार ६११ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे़ यामध्ये एलबीटी आणि एस्कॉर्टचे उत्पन्न सर्वाधिक म्हणजे १७० कोटी १९ लाख आहे़