आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेऊर (ता. अक्कलकोट) येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अक्कलकोट तालुक्यात सध्या काँग्रेसला पोषक वातावरण आहे. या सर्व बाबींचा विचार करता तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळावा घेत आहोत. वरिष्ठांच्या आदेशानुसार आघाडी करायची की नाही, हे ठरविण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर लढण्याचा आदेश मिळाल्यास मित्रपक्षांशी चर्चा करून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले. यावेळी पं.स. सदस्य विलास गव्हाणे, वकील बागवान, विश्वनाथ हडलगी आदी उपस्थित होते.
...........
कोरोनामुळे दौरे टाळले
विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे तालुक्यापासून अलिप्त झाल्याची चर्चा होत आहे, असे म्हेत्रे यांना विचारले असता ते म्हणाले, कोरोना झाल्यानंतर काय त्रास होतो, याची कल्पना मी करू शकत नाही. गोरगरिबांना कोरोनाचा त्रास होऊ नये, ही भावना आहे. कोरोना परिस्थितीमुळे जनतेच्या काळजीपोटी दौरे टाळले. मात्र, घरी बसूनही कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद सुरूच होता. यापुढे दौरे सुरू राहणार असल्याचे म्हेत्रे यांनी सांगितले.
..........
(फोटो : सिद्धाराम म्हेत्रे)
250821\fb_img_1544119396273.jpg
माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांचा फोटो..