पंढरपूर-मंगळवेढ्याचे आ. भारत भालके यांचे मागील आठवड्यात अल्पशा आजाराने निधन झाले. याबद्दल मंगळवेढा येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची शोकसभा आयोजित केली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार पवार यांनी आ. भारत भालके यांनी ४० गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. ३५ गावच्या शेतीच्या पाण्यासाठी अखेरपर्यंत लढा दिला. हे कार्य दृष्टिक्षेपात असून भालके यांच्या वारसाच्या पालकत्वाची जबाबदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पक्षनेते अजित जगताप, बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, वंचित बहुजन आघाडीचे दत्तात्रय खडतरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष ॲड. राहुल घुले यांनी आ. भारत भालके यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी मनसेचे चंद्रकांत पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद पाटील, औदुंबर वाडदेकर, नारायण गोवे, नारायण घुले, आप्पा चोपडे, अक्षय होवाळे, युन्नूस शेख, चंद्रकांत जाधव, रामचंद्र वाकडे, लतिफ तांबोळी, मुजम्मील काझी, संदीप बुरकुल, विजयकुमार खवतोडे, मारुती वाकडे, अजित यादव आदी या शोकसभेत सहभागी झाले होते.