वागदरी पोलीस ठाण्याची इमारत ब्रिटिशकालीन असून, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेले महत्त्वाचे दूरक्षेत्र आहे. पोलीस ठाण्याच्या अंतर्गत १९ गावे आहेत. अक्कलकोट तालुक्यातील अतिशय संवेदनशील गाव म्हणून वागदरीची ओळख आहे. म्हणूनच या ठिकाणी पोलीस दूरक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी एक अधिकारी, दोन हवालदार आणि चार पोलीस कर्मचारी असे एकूण सहा कर्मचारी आहेत. ब्रिटिशकाळापासून या ठिकाणी पोलीस स्टेशन असून, ऐतिहासिक पुरातन इमारत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तात्काळ दुरुस्ती करून कर्मचाऱ्यांची सोय करण्याची मागणी होत आहे.
..........
वागदरी पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे राहण्याची सोय नाही. सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास कर्मचारी कुटुंबीयांसमवेत राहण्यास येतील.
- अंगद गिते, हवालदार
फोटो ओळ : वागदरी पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.