सोलापूर : जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांसाठी खूषखबर... गेल्या दोन वषार्पासून प्रलंबित असलेले जिल्हा परिषदेचे आदर्श अंगणवाडी पुरस्कार लवकरच जाहीर केले जाणार असल्याची महिला व बाल कल्याण अधिकारी जे. एस. शेख यांनी दिली.
जिल्हा परिषदेतर्फे गेल्या दोन वर्षात अंगणवाडी कर्मचाºयांसाठी असलेले पुरस्कार दिलेच नव्हते. महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत यावर चर्चा झाली. त्यानंतर ही बाब निदर्शनाला आणून दिल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी यासाठी येणाºया खचार्ला मान्यता दिली. दरवर्षी अकरा तालुक्यातील ९६ अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि १६ पर्यवेक्षिकांना पुरस्कार दिले जातात. दोन वषार्चे पुरस्कार म्हणजे १९२ अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि ३२ पर्यवेक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात ३ हजार २६९ अंगणवाड्या व ९४५ मिनी अंगणवाड्या चालविल्या जातात. या अंगणवाड्यांतून ६ वर्षे वयोगटाच्या आतील २ लाख ७४ हजार ७२ बालकांचे पोषण व प्रशिक्षण दिले जाते. जिल्ह्याातील अंगणवाड्यांमध्ये ३११६ सेविका तर ३१११ मदतनीस कार्यरत आहेत. बालकांचे पोषण व प्राथमिक शिक्षणाबरोबरच आरोग्य खात्यामार्फत राबविल्या जाणाºया विविध योजनांची अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांचा उपयोग होतो. लसीकरण असो किंवा गरोदर, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींच्या पोषणांचे अहवाल सेविका व पर्यवेक्षकांमार्फत दिला जातो.
अंगणवाडीसाठी हेही महत्वाचेजिल्ह्यातील अंगणवाडी सेविका १५३ व मदतनिसांच्या १५८ जागा रिक्त आहेत. यातील पन्नास टक्के जागा भरण्याचे नियोजन आहे. सेविकांच्या भरतीत मदतनिसांना सामावून घेण्याचे धोरण आहे. मदतनिसांसाठी सातवी तर सेविकेसाठी दहावीपर्यंत शिक्षणाची अट आहे. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या व दोन वर्षे सेवा केलेल्या मदतनिसांना अंगणवाडीसेविका करण्यात येणार आहे. यानुसार तालुका बालविकास अधिकाºयांना रिक्त जागा व पात्र मदतनिसांची यादी करण्याचे सूचित करण्यात आले आहे. अशाप्रकारे सेविकांची भरती केल्यावर ही पदे कमी होऊन मदतनिसांची रिक्त पदे वाढणार आहेत. त्यानंतर या पदावर भरती घेतली जाणार आहे. सेविका व मदतनिसांची भरती करताना कुपोषित बालकांचे प्रमाण, डोंगराळ व दुर्गम भाग, मुलांची उपस्थिती यांचा प्राधान्याने विचार करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार भरतीची प्रक्रिया तालुकास्तरावर राबविली जाणार आहे. भरती करताना शिक्षण व अनुभवानुसार गुण ठरविले जाणार आहेत, असे शेख यांनी सांगितले.