शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

जाणून घ्या; 'कोरोना'ची कशी आहे सोलापूर जिल्ह्यातील उपचार व्यवस्था...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 11:12 AM

रुग्णालयाचे तीन टप्पे: ४५६२ डॉक्टर व कर्मचाºयांना खास प्रशिक्षण

सोलापूर: सोलापूर शहर आणि जिल्हयात कोव्हीड :१९ या आजाराच्या रुग्णांसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्रिस्तरीय यंत्रणा उभी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिाकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.

कोव्हीड:१९ अर्थात कोरोनाा विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांसाठी उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खास यंत्रणा तयार केली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे ४७५७ इतके डॉक्टर, ब्रदर, तंत्रज्ञ आणि परिचारिका असे मनुष्यबळ उपलब्ध आहे. यातील ४५६२ जणांना कोरोना रुग्णांवर कसे उपचार करायचे याबाबत खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोरोना आजाराच्या रुग्णांच्या सर्वेक्षणासाठी २८३५ आशा वर्करची मदत घेण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय उपचार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यात कोव्हिड केअर, कोव्हिड डेडीकेड हेल्थ आणि कोव्हिड हॉस्पीटल अशा टप्प्यांच्या समावेश आहे. कोव्हिड केअरमध्ये संशयितांवर उपचार केले जात आहेत. कोव्हिड डेडीकेडमध्ये मध्यम स्वरूपाचे सिमटम आढळलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत तर कोव्हिड हॉस्पीटलमध्ये तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

अशी आहेत उपचाराची ठिकाणे...

महापालिका क्षेत्रात ६ ठिकाणी कोव्हीड केअरची व्यवस्था असून, यात २८२५ रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. कोव्हिड हेल्थची ६ ठिकाणे असून या ठिकाणी ५४0 रुग्णांची व्यवस्था आहे. कोव्हिड हॉस्पीटलची तीन ठिकाणी व्यवस्था असून, या ठिकाणी ६२0 व्यक्तींवर उपचाराची व्यवस्था आहे. सिव्हिल हॉस्पीटल (शासकीय रुग्णालय), अश्विनी व यशोधरा रुग्णालयाचा यात समावेश आहे.

जिल्ह्यात २५ ठिकाणी व्यवस्था...

जिल्ह्यात ११ तालुके व महत्वाची मोठी गावे अशा २५ ठिकाणी कोव्हिड केअरची व्यवस्था असून येथे ४ हजार ८६0 रुग्णांची सोय होणार आहे. त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी हेल्थ सेंटरची व्यवस्था असून, यात ७२९ जणांवर उपचार करण्याची सोय आहे. तसेच कोव्हिड हॉस्पीटलसाठी ६ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असून, ६५८ तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय खाजगी रुग्णालये ताब्यात घेण्याची तयारी असून, गरज भासल्यानंतर ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल