सोलापूर : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अनेक अडचणींचा सामना करीत आहे़ कार्यालयासाठी अनेक पदे मंजूर आहेत. मोटार वाहन सहायक निरीक्षक आणि निरीक्षकांच्या ४९ जागा मंजूर असून, उलटपक्षी १२ जागा रिक्त आहेत़ जिल्ह्यात सर्वप्रकारच्या जवळपास १५ लाख वाहनांची नोंदणी असून, त्यांचे फिटनेस, परवाने आदी कामे कोरोना काळात १५ टक्के मनुष्यबळावर होत आहे़ मात्र, प्रत्यक्ष भरतीला कोरोनाचे ग्रहण लागले आहे.
येथील उपप्रादेशिक कार्यालयाचे कामकाज पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अख्त्यारीत असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मदतीला दोन सहायक परिवहन अधिकारी आहेत. मोटार वाहन निरीक्षकांना नवीन वाहनांची नोंदणी, कच्चे-पक्के लायसन्स, चाचणी वाहन योग्यता प्रमाणपत्र, वाहन हस्तांतरणाची कागदपत्रे तपासणी कामे करावी लागतात़ या वाहन निरीक्षकांच्या मदतीसाठी सहायक मोटार वाहन निरीक्षक आहेत.
पूर्वी वाहन तपासणीकरिता वाहन संख्येचे बंधन नसल्याने आलेल्या वाहनांकडून शुल्क भरून घेऊन योग्यता प्रमाणपत्र देत होते़ असाच प्रकार लायसन्सबाबतीत सुरू होता़ या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली़ यावर न्यायालयाने एका मोटार वाहन निरीक्षकाने त्याच्या कार्यालयीन वेळेत किती वाहने तपासावीत, लायसन्स देण्यास ठराविक संख्या निश्चित केली़ सरकारने याच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले़ सुरुवातीला याकडे दुर्लक्ष झाले़ सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिकाही दाखल झाली़ काम न करणारे अनेक मोटार वाहन निरीक्षक न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित झाले़ आदेशानुसार एक मोटार वाहन निरीक्षक दिवसाकाठी फक्त २५ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र, ३० जणांची चाचणी घेऊन पक्के लायसन्स देऊ शकतो.
सोलापुरात १५ लाखांहून अधिक वाहनांची नोंदणीसहायक परिवहन अधिकाºयाची एक जागा वर्षभरापासून रिक्त आहे़ मोटार वाहन निरीक्षकाची २३ पदे मंजूर असून सहा पदे रिक्त आहेत़ १७ मोटार वाहन निरीक्षकांपैकी सध्या पाच निरीक्षक हे चेकपोस्टवर चक्र ाकार पद्धतीने कार्यरत आहेत़ दोन मोटार वाहन निरीक्षक हे भरारी पथकात तर दोन निरीक्षक शिबिरांसाठी आहेत़ सहायक निरीक्षकांच्या २६ जागा रिक्त आहेत तर सहा जागा रिक्त आहेत़
दिवसभरात शंभर वाहनांचे नूतनीकरण होते़ वेटिंग पिरीयड तीन महिन्यांच्या पुढे गेला आहे़ वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण नसणाºया वाहनांकडून अपघात झाल्यास नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनी घेत नाही़ प्रतिक्षा कालवाधीमुळे विनालायसन्स वाहन चालविणाºयांची संख्या वाढू शकते़ निरीक्षकांच्या भरतीबाबत चार दिवसांपूर्वी आदेश निघाले आहेत. त्याची लवकर अंमलबजावणी व्हावी़ - विजय इंगवलेसेक्रेटरी, राजपत्रित अधिकारी, मोटार वाहन संघटना
एकूण १५ लाख वाहनांपैकी ट्रान्स्पोर्ट अंतर्गत दोन लाख वाहने नोंदीत आहेत. त्यांना प्रत्येक वर्षी योग्यता प्रमाणपत्र घेणे सक्तीचे आहे़ मोटार वाहन निरीक्षकांची संख्या, रविवार- शनिवार, इतर शासकीय सुट्या लक्षात घेता वर्षभरात सरासरी २४० दिवसांचे कामकाज होते़ -उदयशंकर चाकोते अध्यक्ष, मोटार मालक संघ