माघ वारीच्या पार्श्भूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पोलिसांना सूचना देण्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी पंढरपूर उप विभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, प्रशांत भस्मे उपस्थित होते.
पुढे झेंडे म्हणाले, स्थानिक नागरिकांना एसटी ने पंढरपुरात येण्यास मज्जाव नाही. परंतु भाविकांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर यात्रेपूर्वी पंढरीतील यामध्ये अनेक वारकऱ्यांनी मुक्काम केला आहे. वारकऱ्यांनी शनिवारी रात्री बाराच्या आत पंढरपुरातून माघारी जायचे आहे.
मठांची तपासणी करण्यासाठी चार पथके नेमण्यात आले आहेत. ज्या मठामध्ये रविवारी भाविक असल्याचे आढळून येतील, त्या संबंधीत मठाधिपतींवर गुन्हा दाखल करणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले.
असा आहे पोलीस बंदोबस्त
जिल्हा पोलीस अधीक्षक २
उपविभागीय पोलिस अधिकारी ३,
पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक / उप पोलीस निरीक्षक ९०,
पोलीस कर्मचारी ८००, दंगा काबू पथक १, एस आर पी एफ १ कंपनी
होमगार्ड - ६००
----