सोलापूर: नोंदणी झालेल्या ११ हजार ९२ पैकी ७ हजार ७६० शेतकºयांची तूर १४ मेपर्यंत खरेदी झाली असून, नोंदणी केलेल्या सर्वच शेतकºयांना हमीभाव केंद्रातून मेसेज गेले असल्याचे सांगण्यात आले, परंतु शेवटच्या एका दिवसात म्हणजे मंगळवार १५ मे रोजी ३३३२ शेतकºयांची तूर खरेदी झाली का?, हे बुधवारी समजणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात आठ हमीभाव केंद्रावर तूर खरेदी झाली आहे. या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केली जाते. जिल्ह्यातून ८ केंद्रावर नोंदणी केलेल्या शेतकºयांची मुदतीत खरेदी झाली नसल्याने शासनाने मुदतवाढ दिल्यानंतर खरेदी सुरू झाली आहे. तूर खरेदी १५ मेपर्यंतच करावयाची आहे.
१४ मेपर्यंत नोंदणी केलेल्यापैकी ७ हजार ७६० शेतकºयांची तूर खरेदी झाली होती. उर्वरित ३३३२ शेतकºयांची तूर खरेदी केवळ एका दिवसात करावयाची होती. नोंदणी केलेल्या सर्वच शेतकºयांना तूर खरेदीसाठी आणण्याबाबत मेसेज पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले; मात्र बºयाच शेतकºयांनी हमीभाव केंद्रावरील जाचक अटीमुळे व्यापाºयांना तूर विक्री केली असल्याचे सांगण्यात आले. यामुळे शेवटच्या एका दिवसातही तूर खरेदीला म्हणावी तशी गर्दी नसल्याचे सांगण्यात आले.
केंद्राचे नाव नोंदणी शेतकरी प्रत्यक्षात खरेदी (क्विं.) सोलापूर १६७० १२०८ १५,४९८माळकवठे ८३० ६४१ ९३६७बार्शी १४०३ ८३४ ९०९९दुधनी १२१० ८३६ १३,१६४अक्कलकोट १२८० ९३१ ११८२४कुर्डूवाडी २२५० १७३२ १६,६४५करमाळा ९४३ ७१८ ७०९९मंगळवेढा १५०६ ८६० ८७२४एकूण ११०९२ ७७६० ९१४२०