सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, संचालक बाबाराजे देशमुख, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सभासद बलभीम पाटील, रमेश जगताप, सुरेश पाटील यांच्यासह अन्य संचालक व अधिकारी उपस्थित होते. उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक रविराज जगताप यांनी विषय वाचन केले. सुनील माने यांनी आभार मानले.
एक पैसाही बुडविणार नाही
१० डिसेंबर २०१८ ला सभासदांनी या कारखान्याची सुत्रे आमच्या हाती दिली. त्याचवेळी कारखाना सुरु करण्याचा शब्द आम्ही दिला. त्याच विश्वासाने सन २०२०-२१ चा गळीत हंगाम आम्ही सुरु केला. काही तांत्रिक अडचणीमुळे केवळ १६ हजार २६७ मे . टन उसाचे गाळप करता आले. पुढील वर्षासाठी कारखान्याकडे सुमारे ४१९० एकर उसाची नोंद झाली आहे. कारखान्यासमोर अडचणी आहेत त्या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आपण दूर करु. उस उत्पादक व कामगारांचा एक पैसाही आम्ही बुडविणार नाही. सर्वांनी संचालक मंडळाला साथ द्यावी, असे आवाहन आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले.