सोलापूर : एक काळ मैत्री होती, आता नाही़ अनेक प्रकारे केलेली गुंतवणूक ही कमी करण्यासाठी प्रयत्न करू...स्वदेशीबाबत जनजागृती करू... टिकटॉकसारखे चिनी अॅप बंद करू. आत्मनिर्भर होऊन लढू़.. चीनला धडा शिकवू़.. विश्वासघात करणाºया दुश्मनाला धडा शिकवू, अशी संतप्त प्रतिक्रिया सोलापुरातील तरूणाईमधून गुरूवारी व्यक्त झाली.
भारतीय सीमेवर गलवान खोºयात झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाल्यानंतर भारतातून चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे़ तरूणाईसह प्रत्येकाच्याच मोबाईलवर टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह विविध अॅप्स् डाऊनलोड केलेले असतात. हे सर्व अॅप्स् बंद करण्यात येतील, असेही युवकांनी सांगितले.
चीनी अॅप बंद करण्याबरोबरच घरात लागणाºया दररोजच्या वस्तू या भारतीय बनावटीच्याच येतील, याची आम्ही काळजी घेणार आहोत, असेही युवक, युवतींनी सांगितले.
चीनने भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला संताप यावा, असे कृत्य केले आहे़ कोरोनामुळे चीनचे नाव खराब झाले आहे़ याच काळात भारतावर हल्ला करून चीनने जगभराचा रोष ओढवला आहे़ चीनच्या वस्तू खरेदी करणार नाही़ मोबाईलमधील अॅप अनइन्स्टॉल करतोय.- मयूर गिरे, विद्यार्थी, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
लोकमान्य टिळकांची आज आठवण होतेय़ त्यांनी त्याचवेळी स्वदेशीचा नारा दिला होता़ सर्वसामान्यांनी उलट चायना वस्तू वापरून त्यांची निर्यात वाढवली आणि भारतातील निर्यात घटवली़ हीच वेळ आहे स्वयंभू होण्याची़ त्यामुळे आम्ही यापुढे स्वदेशीचा पुरस्कार करू तो इतरांमध्ये रूजवू.- प्रांजल कोळी, विद्यार्थिनी
चिनी वस्तू वापरू नका, असे सोशल मीडियावर सुरू झालेल्या कॅम्पेनला माझा पाठिंबा आहे़ विदेशी वस्तूपेक्षा भारतीय वस्तू खरेदी करण्यासाठी यापुढे पुढाकार असणार आहे़ सोशल मीडियावर लवकरच कॅम्पेन सुरू करणार आहे़ स्वदेशीचा स्वीकार करून भारतीय अर्थव्यवस्था बळकट करू.- फैय्याज शेख, विद्यार्थी, माऊली महाविद्यालय, वडाळा
भारतीय अर्थव्यवस्थेबाबत जनजागृती करण्याची संधी आम्हा युवतींना मिळाली आहे़ समाजकार्याचे धडे घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये चीनचा लपलेला खरा चेहरा पुढे आणू़ भारतातील विविध स्टार्टअपमध्ये चिनी गुंतवणूक झाली आहे़ यातून चीन भारतातून पैसा ओढत आहे़ - मेघा लंबे, युवती
लडाखमध्ये चिनी सैन्याशी भारतीय सैन्य लढत आहे़ भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्याच्या संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न क रणार आहे़ गलवान खोºयात चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले़ लढणाºया सैन्याला औषधे, आर्थिक बळ देण्यासाठी समाजात जनजागृती करू़ - दर्शना माळी, युवती