शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
3
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
4
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियंस
5
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
6
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
7
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
8
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
9
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
10
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
12
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
13
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
14
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
15
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत
16
Video - "मला ४० लाख..."; कर्ज फेडण्यासाठी Axis बँकेत घातला दरोडा, मॅनेजरला दिली धमकी
17
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर
18
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
19
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
20
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट

सोलापूर जिल्ह्यातील मतदार वाढीसाठी १३ लाख मतदारांनी दिले सहीचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:16 PM

शाळा-शाळांमधून घेतलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ८ लाख लोकांना बचत गट, पालक, शासकीय कर्मचारी, युवा मतदार यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली आहे.

ठळक मुद्देशाळा, अंगणवाडी, बचत गट सदस्यांच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात २६७५ रॅली काढण्यात आल्या ४५० घंटागाड्यांवर मतदान जनजागृती संदेश देण्यात आले आहेतमतदान जनजागृतीसाठी विविध अधिकाºयांनी दिलेला व्हिडीओ संदेश ७ लाख ४ हजार १५२ लोकांनी पाहिला

सोलापूर : जिल्ह्यात मतदान जनजागृती अंतर्गत १२ लाख ९९ हजार ८४० मतदारांची स्वाक्षरी घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मतदान जनजागृती अधिकारी तथा झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी  पत्रकारांशी बोलताना दिली.

सोलापूरमाढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून मतदान जनजागृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमात शहर व जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा ४८१७ शाळांमध्ये पोहोचून विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालक व कुटुंबातील सदस्यांची मी मतदान करणार या पत्रावर स्वाक्षरी घेण्यात आली. अशी स्वाक्षरी झालेली १३ लाख पत्रे जिल्हा परिषदेकडे जमा झाली आहेत. त्याचबरोबर पत्रलेखन या उपक्रमांतर्गत ४ लाख ७३ हजार २२६ पत्रे विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. तसेच शाळा-शाळांमधून घेतलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ८ लाख लोकांना बचत गट, पालक, शासकीय कर्मचारी, युवा मतदार यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी एकाच वेळी ९ हजार लोकांना प्रतिज्ञा दिली आहे. जिल्ह्यातील ४७१७ शाळांमधून ३ लाख ३० हजार १९८ विद्यार्थ्यांनी निबंध सादर केले आहेत तर रांगोळी स्पर्धेत २ लाख २३ हजार ९२१ विद्यार्थी, महिला व पालक सहभागी झाले होते. 

मतदान जनजागृतीसाठी विविध अधिकाºयांनी दिलेला व्हिडीओ संदेश ७ लाख ४ हजार १५२ लोकांनी पाहिला आहे. याप्रसंगी शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी सयाजी क्षीरसागर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे, प्रकाश राचेट्टी, आब्बास शेख उपस्थित होते. 

यांनी घेतले परिश्रमशाळा, अंगणवाडी, बचत गट सदस्यांच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात २६७५ रॅली काढण्यात आल्या. यामध्ये ७ लाख ८९ हजार ३० लोकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १०१८ बोर्ड, २६७५ बॅनर्स, १२५५ भित्तीचित्रे काढण्यात आली आहेत. ४५० घंटागाड्यांवर मतदान जनजागृती संदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, सर्व शाळा, अंगणवाडी, स्वीप समितीचे सदस्य, अधिकारी, कर्मचाºयांनी परिश्रम घेतल्याचे भारूड यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग