शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

निर्जंतुकीकरणाचे डोम आरोग्यासाठी अपायकारक, आरोग्य सेवा संचालकांचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 7:42 PM

शास्त्रीय आधार नसल्याचे स्पष्टीकरण; महापालिका, झेडपी आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करावी

ठळक मुद्देकोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्जसोलापूर शहरातील प्रत्येक नागरिकांची महापालिका आरोग्य विभागाकडून तपासणी सर्वसंचार बंदीच्या अनुषंगाने सोलापूर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याच्या नावाखाली शासकीय कार्यालयांसह अनेक खासगी ठिकाणी उभारलेले सॅनिटेशन डोम, बोगदे बंद करावेत, असे आदेश राज्याच्या आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी महापालिकांना आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत. कोविड १९ उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम, टनेलचा वापर सुरू करण्यात आला आहे. या डोमच्या माध्यमातून व्यक्ती, समुहाच्या अंगावर निर्जंतुकीकरणसाठी सोडियम हायपोक्लोराइटची फवारणी करण्यात येत आहे. या डोमला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही. अनेकदा ही रसायने व्यक्तीला अपायकारक ठरु शकतात, असे आरोग्य सेवा संचालक अर्चना पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती, व्यक्ती समूह यांच्यावर निर्जंतुकीकरणासाठी या औषधांची फवारणी करु नये. फवारणीसाठी उभारलेले डोम, बोगदे यांचा वापर होऊ नये याची काळजी घ्यावी. संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती द्यावी, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सोलापुरातील डोम हटवावे लागतील सोलापूर जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालये, पेट्रोल पंप, ग्रामपंचायती यांनी निर्जंतुकीकरणाचे बोगदे उभारले आहेत. काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या बोगद्यांची उभारणी केली आहे. हे डोम हटवण्यात यावेत, असे निवेदन शहरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश कावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस