शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

रात्रीच्या पंढरीतही विठुनामाचा प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:50 AM

रात्रभर टाळ, मृदंगाचा निनाद : प्रशासन जागल्याच्या भूमिकेत

ठळक मुद्देआपत्कालीन यंत्रणा सज्ज; २४ तास औषधोपचार सेवाभाविक शांततेने दर्शनरांगेत सहभागी६५ एकरांवरील सर्वच यंत्रणा अलर्ट

प्रभू पुजारीपंढरपूर : कार्तिक वारी सोहळा़़़ पंढरीत भरू लागला वारकºयांचा मेळा़़़ सर्वच मार्गांवरून झपाझप पावले टाकीत भाविक मंदिराच्या दिशेने निघालेले़... शेकडो किमीचा प्रवास करून आलेले भाविक जिथे जागा मिळेल तिथे विसावत होते़ दिंड्यांतील वारकरी मात्र रात्रभर भारुड, भजन, कीर्तनात दंग झाले होते़ त्यामुळे दर्शनरांग, चंद्रभागा वाळवंट असो, ६५ एकर परिसर असो, वा मठ, धर्मशाळा सर्वत्र रात्रभर टाळ, मृदंगाचा निनाद अन् विठुनामाचा गजर सुरुच होता़ शिवाय प्रशासन जागल्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून आले.

‘लोकमत चमू’ने शनिवारी रात्री ११ ते ३ वाजेपर्यंत कार्तिक वारीनिमित्त या भूवैकुंठनगरीत ‘रात्रीची वारी’चा आढावा घेतला़ रात्री ११ वाजता शिवाजी चौक, चौफळा येथून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे जात असताना वारकºयांची दर्शन रांगेकडे जाण्याची लगबग सुरू असल्याचे दिसून आले़ इतर दिवशी बंद असणारी सर्वच दुकाने शनिवारी रात्री ११ वाजून गेल्यानंतरही ती उघडीच होती़ मंदिराच्या पश्चिमद्वाराजवळ जाताच मंदिरावर विद्युतरोषणाई केल्याने हा परिसर लख्ख प्रकाशाने उजळून निघाल्याचे दिसून आले.

 मंदिरावर लखलखणाºया विद्युतमाळांना भाविक आपुलकीने माना वर करून पाहत होते़ व्हीआयपी गेटसमोर ८ ते १० पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज होते़ नामदेव पायरीजवळ जाताच समोरील संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातून भाविकांचा ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल़़़’ चा जयघोष ऐकू येत होता़ शिवाय तेथील कर्मचारी शिट्टी वाजवून ‘चला पुढे चला’ म्हणत असल्याचे ऐकू येत होते़ भाविकांची गर्दी लक्षात घेऊन नामदेव पायरीजवळून प्रवेश बंद करून संत तुकाराम भवनापासून मुखदर्शनाची सोय केली होती़ रात्र असतानाही या ठिकाणी देणगी कक्ष सुरू होता़ शेजारीच हार विक्रेताही डुलकी मारत होता, पण भाविक येत असल्याचे दिसताच ‘हार घ्या, हाऱ़़’ असे म्हणत जागे व्हायचा.

वाळवंटात उघड्यावरच विसावले भाविक ११़२५ वाजता महाद्वार घाटाकडे निघताना येथील सर्व दुकाने सुरुच असल्याचे दिसून आले़ महाद्वार घाटावरून उतरून चंद्रभागा वाळवंटात गेलो़ पुंडलिक मंदिराकडे ह़ भ़ प़ धोंडोपंतदादा महाराज शिरवळकर यांची दिंडी मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे आपल्या मठाकडे मार्गस्थ होत होती़ वाळवंटात सर्वत्र थकून आलेले भाविक उघड्यावरच विसावा घेत होते़ भाविक झोपलेले असतानाही त्यांना न तुडविता जनावरे इकडून तिकडे फिरताना दिसून आली़ वाळवंटात ह़ भ़ प़ सुमनताई महाराज तरडे यांचे कीर्तन सुरू होते़ मोजकेच भाविक गोल रिंगण करून कीर्तन ऐकत होते़ दिवसभर नदीत भ्रमंती करणाºया होड्या पात्राच्या कडेला नि:स्तब्ध उभ्या होत्या़ चंद्रभागेच्या दोन्ही तीरावरील मंदिरांना विद्युतरोषणाई केल्याने त्याचे प्रतिबिंब चंद्रभागेत उजळून दिसत होते.

६५ एकरांवरील सर्वच यंत्रणा अलर्टवाळवंटातून ६५ एकर परिसराकडे जात असताना नवीन पुलावर शांतता होती़ अधूनमधून वाहने ये-जा करायची़ पुलाच्या पलीकडे येताना दुचाकी पंक्चर झाल्याने दोघे गाडी ढकलत शहराकडे येत होते़ १२ वाजता ६५ एकर परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येताच उजव्या बाजूला आपत्कालीन मदत केंद्र सुरूच होते, तर डाव्या बाजूला राहुटीसमोरच खुर्ची टाकून पोलीस आणि वीज वितरणचे कर्मचारी गप्पा मारत बसले होते़ शेजारी अग्निशमन गाडी उभी होती़ आत प्रवेश केल्यानंतर घोडकी (ता़ वाशी, जि़ उस्मानाबाद) येथील तपोनिधी वैराग्यमूर्ती संजीवन समाधी शनिगिरी महाराजांच्या फडावर भजन सुरू होते़ मध्यरात्र झाल्याने इकडे भजन चालू असताना शेजारीच एकजण गॅसवर चहाचे पातेले ठेवून चहाची व्यवस्था करण्यात मग्न होता़ समोर रस्त्यावर पाण्याचे टँकर उभे होते़ काही भाविक तोटी चालू करून पाणी घेऊन जाताना दिसले़ कर्नाटकातील भाविक भजन उरकून या रस्त्यावरच थाटलेल्या पानटपरीवर चहा पिण्यासाठी आलेले होते़ भोसे (ता़ पंढरपूर) येथील ताजोद्दीन शेख यांनी गरम चहा के़ पी़ अल्लमस्वामीसह अन्य चार भाविकांना दिला़ हे भाविक चहा पित कन्नडमधून चर्चा करीत असल्याचे दिसून आले़ मध्यरात्र उलटून गेल्याने अनेक दिंड्यांतील वारकरी झोपल्याचे दिसून आले़ 

भाविक शांततेने दर्शनरांगेत सहभागी- तेथून गोपाळपूर रोडवरील पत्राशेडकडे जाताना रस्त्यावर कर्नाटकातून आलेल्या भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे जात होते़ रात्री २़१५ वाजता मंदिर समितीने उभारलेला ७ नंबरचा गाळा भाविकांनी भरलेला होता़ भाविक घाईगडबडीत पण शांततेने दर्शन रांगेत सहभागी होत असल्याचे दिसून आले़ या परिसरात विजेची सोय केल्याने सर्वत्र लख्ख प्रकाश दिसून आला़ शेडच्या बाहेर अनेक चहा विक्रेते स्टॉल मांडून सज्ज होते़ भाविक मागणी करून चहा घेताना दिसून आले़ समोरच मोठा स्टेज उभारून पोलीस सर्वत्र पहारा करीत होते़ कोठेही अनुचित प्रकार किंवा रांगेत घुसखोरी होणार नाही, याची दक्षता पोलीस घेताना दिसून आले.

आपत्कालीन यंत्रणा सज्ज; २४ तास औषधोपचार सेवाच्वाळवंटातच एका बाजूला आपत्कालीन मदत केंद्रावर इचलकरंजीचे सपोनि प्रमोद मगर हे ‘माऊली! चोर, खिसेकापूंपासून सावधान राहा, पाण्यात जाऊ नका’ अशा सूचना माईकवरून भाविकांना देत होते़ वाळवंटात निर्भया पथक, बॉम्बशोधक पथक, रात्रभर पेट्रोलिंगसह आपत्कालीन यंत्रणा सज्ज होती़ त्यांच्या शेजारीच नगरपरिषदेचे एस़ एस़ थोरात हे २४ तास औषधोपचारासाठी भाविकांच्या सेवेत होते़

जनावरांच्या बाजारात केवळ हंबरणे...- ६५ एकर परिसरातून जनावरांच्या बाजाराकडे जात असताना सरगम चौक येथील रेल्वे पुलाखाली रात्री १़२० वाजता खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते़ त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ १० मिनिटांत हे काम उरकते घेतले़ त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली़ कॉलेज चौक, इसबावीमार्गे वाखरीकडे जाताना शुकशुकाट होता़ कॉलेज चौकात मात्र उपप्रादेशिक परिवहनचे सहायक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण सायरन वाजवित आले़ ते येताच तेथील बंदोबस्तावर असलेले पोलीस जमले़ चव्हाण यांच्या सूचना ऐकून घेतल्या़ त्यानंतर सारंग चव्हाण हे पुढे मार्गस्थ झाले़ वाखरी मार्गावर शुकशुकाट होता़ अधूनमधून जनावरे घेऊन वाहने बाजारतळाकडे जात होती़ जेव्हा बाजारतळावर पोहोचलो तेथे नीरव शांतता दिसून आली़ इकडे पंढरपुरात सर्वत्र टाळ, मृदंगाचा निनाद ऐकू यायचा, पण या ठिकाणी केवळ जनावरांचे हंबरणे ऐकू आले़ बाजारतळावर फेरफटका मारला असता नवीन जागा असल्याने काही जनावरे हंबरत होती़ काही शेतकरी गप्पा मारत होते तर काही जण झोपल्याचे दिसून आले़ या ठिकाणी मात्र कुठेही पोलीस बंदोबस्तावर असलेले दिसून आले नाहीत़ सातारा रोडमार्गे बाहेर आल्यानंतर वाखरी पोलीस चौकीत पोलीस जागे होते़ तेथून पुन्हा शहरात बसस्थानक परिसरात एस़टी़ची ये-जा सुरू होती़ भाविक बाकावर झोपलेले दिसून आले़ शहर पोलीस ठाण्यात शांतता होती़ कोणीही दिसून आला नाही़ 

सांप्रदायिक भजनाने  वेधले लक्ष- शहरात सावरकर चौक मार्गे जात असताना रात्री १़४५ वाजता एक अ‍ॅम्ब्युलन्स जाताना दिसली़ शिवाजी चौकातून पुढे चौफाळा येथे रात्री १़५० वाजता येताच १०० पेक्षा जास्त वारकरी ठेका धरून सांप्रदायिक भजन करीत असल्याचे दिसून आले़ अधिक माहिती घेतली असता पंढरपुरातीलच धोंडोपंतदादा महाराज संस्थानचे ह़ भ़ प़ प्रताप महाराज बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे भजन सुरू असल्याचे दिसून आले़ सुमारे एक तास मृदंगाच्या आवाजावर लेझीमप्रमाणे वारकरी पावले टाकीत शिस्तबद्धपणे ठेका धरीत होते़ वारकºयांचा हा ठेका मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अन्य भाविकांची लगबग सुरु होती़ रात्री १० वाजता निघालेली ही दिंडी प्रदक्षिणा मार्गावरून जात पहाटे ६ वाजता मठात पोहोचेल, असे चोपदारांनी सांगितले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी