शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कर्जमाफीसह काटकसरीमुळे तरली सोलापूर जिल्हा बँक, २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:37 PM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेसाठी धावून आली तसेच विविध कामासाठी होणाºया खर्चात काटकसर केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक तरण्यासाठी २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले आहे.

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक थकबाकी वसुलीमुळे आर्थिक अडचणीत आली आहेमागील दोन वर्षांत काटकसर व वसुलीवर भर दिलाबँकेच्या ठेवीत होणारी घसरण १९२३ कोटींवर थांबलीबँकेच्या सरकारी कर्जरोख्यात नफा ४ कोटी ३३ लाखाने वाढला

अरुण बारसकरआॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २७ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेसाठी धावून आली तसेच विविध कामासाठी होणाºया खर्चात काटकसर केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक तरण्यासाठी २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले आहे. बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सर्व प्रकारच्या उपाययोजना करून बँकेचा खर्च वाचविला आहे.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक थकबाकी वसुलीमुळे आर्थिक अडचणीत आली आहे. यामुळे मागील  तीन-चार वर्षांत कर्ज वाटप थांबले आहेच शिवाय दैनंदिन व्यवहार करणेही कठीण झाले होते. वरचेवर ढासळणाºया प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी मागील दोन वर्षांत काटकसर व वसुलीवर भर दिला.  मागील दोन वर्षांपासून वसुलीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडेच कर्ज थकल्याने वसुलीसाठी मोठ्या अडचणी येत असल्या तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यामुळेच विजय शुगर, आर्यन शुगर व अन्य संस्थांचा ताबा मिळविण्याची प्रक्रिया झाली. पीक विमा व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योेजनेमुळे आतापर्यंत २७५ कोटी रुपयांची शेतकºयांना कर्जमाफी मिळाली. विकास सोसायटीपातळीवर होणारा खर्चही थांबविला. अनेक तांत्रिक बाबींचा आधार घेत जिल्हा बँकेवर होणारी कारवाईही थांबविण्यास यश आले. -------------------------खर्च वाचविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न- बँकेच्या ठेवीत होणारी घसरण १९२३ कोटींवर थांबली.- बँकेच्या सरकारी कर्जरोख्यात नफा ४ कोटी ३३ लाखाने वाढला.- आर.टी.जी.एस., नीट, विमा, ए.टी.एम.चेकबुकच्या माध्यमातून बँकेला नफा ४ कोटी ९५ लाखाने वाढला.- ठेवी व वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने ५६० कर्मचाºयांना वेतनवाढ दिली नाही.च्१२५ शाखांमध्ये बायोमेट्रिकची सुविधा सुरू केली.- चांगले काम केलेल्या मुकुंद काशिद यांना दोन हजार व हजारे यांना पाच हजारांचे बक्षीस देण्यात आले.- कर्मचाºयांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्याने  स्वच्छता मोहिमेला गती मिळाली.- ब्रॉडबँड, कनेक्टिव्हीटी, सीबीएस एएमसी, संगणक मेंटेनन्समध्ये दोन कोटी २९ लाख ७९ हजार रुपयांची बचत केली. - बँकेने नवीन पुष्कर सॉफ्टवेअर कार्यान्वित केल्याने एक कोटी ७४ लाख ४८ हजार २८४ रुपयांचा फायदा झाला. --------------------कर्मचाºयांसाठी कठीण काळ...नोव्हेंबर २०१५ मध्ये बँकेचे उत्पन्न ४३ लाख होते ते नोव्हेंबर १७ मध्ये ५ कोटी ३८ लाख म्हणजे चार कोटी ९५ लाखाने वाढले. याच कालावधीत खर्चात ८ कोटी ५ लाख रुपयांची बचत(कमी) झाली.  सरकारी कर्जरोख्यात ३३३ कोटी २० लाख रुपये गुंतवणूक करावयाची असताना ३५२ कोटी ४६ लाख इतकी गुंतवणूक केली. अपहाराच्या कारणामुळे सहा कर्मचाºयांवर गुन्हे दाखल, आठ कर्मचारी बडतर्फ, ११ कर्मचाºयांचे निलंबन तर ३५ कर्मचाºयांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर केली. 

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक