शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

सोलापूर बाजार समितीची प्रारूप यादी जाहीर, आजपासून पाहण्यास उपलब्ध, नोंदविता येतील हरकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:07 PM

दहा गुंठ्यांवर शेतजमीन असणाºया शेतकºयांना मतदानाचा अधिकार देणारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर बाजार समितीची प्रारूप मतदार यादी जाहीर केली जिल्हा निवडणूक शाखा, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहा. निबंधक सहकारी संस्था सोलापूर शहर, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर यांच्या कार्यालयात पाहायला मिळेल२६ फेब्रुवारीपर्यंत हरकरती नोंदविता येतील. यावरील निकाल ८ मार्चपर्यंत जाहीर होणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : दहा गुंठ्यांवर शेतजमीन असणाºया शेतकºयांना मतदानाचा अधिकार देणारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने सोलापूर बाजार समितीची प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. शुक्रवारपासून ती जिल्हा निवडणूक शाखा, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सहा. निबंधक सहकारी संस्था सोलापूर शहर, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर यांच्या कार्यालयात पाहायला मिळेल. २६ फेब्रुवारीपर्यंत हरकरती नोंदविता येतील. यावरील निकाल ८ मार्चपर्यंत जाहीर होणार आहे.सोलापूर आणि बार्शी बाजार समितीची निवडणूक मार्च महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. शासनाने राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यानुसार सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या मतदार याद्या महसूल प्रशासनाने तयार केल्या आहेत. १० गुंठ्यांवर शेतजमीन असलेल्या आणि वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या शेतकºयांच्या नावाचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. सामायिक खात्यामध्ये केवळ पहिल्या क्रमांकाच्या शेतकºयाची नोंद घेण्यात आली आहे. सोलापूर बाजार समितीच्या १५ गणांमध्ये एकूण ८० हजार ९२८ मतदार निश्चित करण्यात आले आहेत. व्यापारी मतदारसंघात १०६७ तर हमाल मतदारसंघात ११०५ मतदारांचा समावेश आहे. होटगी मतदारसंघात सर्वाधिक ७१०६ मतदारांचा समावेश आहे. बाळे गणात सर्वात कमी ३५८५ मतदार आहेत.बार्शी बाजार समितीची प्रारूप मतदार यादी निवडणूक कार्यालयाने बाजार समितीकडे दिली आहे. ही यादी सोमवारी जाहीर होणार आहे. न्यायालयाने सर्वप्रथम बार्शी बाजार समितीची निवडणूक पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी १५ मार्चपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. --------------------------८० लाख रुपये खर्च अपेक्षित- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ८० लाख रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज जिल्हा निवडणूक शाखेने सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे वर्तविला आहे. बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ७० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही निवडणूक पारंपरिक मतपत्रिकेच्या आधारे होणार असल्याची शक्यता आहे. ---------------------गणाचे नाव आणि कंसात मतदार संख्या- कळमण (४९३७), नान्नज (३९५७), पाकणी (४०२८), मार्डी (४७५३), बोरामणी (६७१२), बाळे (३५८५), हिरज (४०८१), कुंभारी (५२७१), मुस्ती (६३५०), होटगी (७१०६), कणबस (४९३९), मंद्रुप (६३४५), कंदलगाव (६८०७), भंडारकवठे (६०९७), औराद (५९३६). इतर मतदारसंघ : हमाल तोलार : ११०५, व्यापारी ११६७. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती