सोलापूर - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यात मराठा समाजातील आंदोलकांनी काही एसटी बसेसची तोडफोड केली आहे. तसेच पंढरपुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला. राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा न करुन देण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील सकल मराठा समाजाने गेल्या 4 दिवसांपासून विविध तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गेल्या 3 दिवसांपासून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनास आज गालबोट लागल्याचे दिसून येत आहे. मराठा आंदोलक आक्रमक झाले असून एसटी बसेसची तोडफोड करण्यात येत आहे.
Update -
विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात गर्दी वाढली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढला.
वारीमध्ये अनुचित प्रकार घडविण्याचा काही संघटनांचा डाव - मुख्यमंत्री
मराठा आंदोलकांची इच्छा नसेल, तर पंढरपूरातील शासकीय महापुजेला येणार नाही - मुख्यमंत्री