सोलापूर: ग्राहकांनी गाड्या पासिंग करण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांच्या मदतीने त्यांच्या नावे कर्ज घेऊन व कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात फायनान्स कंपनीतील किरण अंबादास कोंडा ( रा. जुना विडी घरकुल) व महमद ख्वाजापाशा महमद कासीम मुल्ला ( रा. जुनी मिल कंपाऊड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एल ॲन्ड टी फायनान्स कंपनीचे तुकाराम पांडुरंग यनगंटी ( रा. शास्त्री नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी किरण कोंडा हा फायनान्स कंपनीच्या वतीने वाहनाच्या शोरूममध्ये फ्रंन्ट लाईन सेल्स ऑफिसर पदी कामाला होता तर आरोपी मुल्ला हा वाहन खरेदी विक्री करणारा एजंट आहे. या दोघांनी मिळून ग्राहकांना नवीन वाहन खरेदी करण्यासाठीच्या रकमेत मोठी सुट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर वाहन पासिंग करण्याच्या नावाने दिलेल्या कादपत्रांच्या आधारे ग्राहकाच्या परवानगी शिवाय वाहन कर्ज मंजूर करून घेतले. ग्राहकांचा व कंपनीचा विश्वासघात करत फसवणूक केली. अशा आशयाची फिर्यादी यनगंटी यांनी फिर्याद दिली आहे. घटनेचा तपास पोसई काळे करत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"