पोहोरगाव परिचारक गट ६ तर विठ्ठल परिवार ३, एकलासपूर परिचारक गट ६ जागा तर विठ्ठल परिवार ३ जागा, उंबरगाव परिचारक भालके आणि काळे गट आघाडी १ जागा तर अपक्ष एका जागी निवडून आला आहे. शेंडगेवाडी काळे-परिचारक आघाडीला ५, अपक्ष १ तर २ जागा बिनविरोध झाल्या.
कासेगाव ग्रामपंचायतीमध्ये परिचारक आघाडीतील वसंतराव देशमुख, प्रशांत देशमुख, विजय देशमुख, बाळासाहेब शेख यांच्या आघाडीला १७ पैकी १४ जागा जिंकल्या असून विरोधकांना फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. रोपळे ग्रामपंचायतीत २५ वर्षानंतर सत्तांतर झाले. १५ पैकी १३ जागांवर रोपळे विकास प्रतिष्ठानने विजय मिळविला असून सत्ताधारी दिनकर कदम गटाला २ जागांवर समाधान मानावे लागले. पटवर्धन कुरोली ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी परिचारक गटाला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी भालके-काळे गटाला ७ तर तिसऱ्या आघाडीला २ जागा मिळविण्यात यश आले आहे. वाडीकुरोली काळे गट ९ विरोधकांना एकही जागा मिळविण्यात यश आले नाही. शिरढोण ग्रामपंचायतीवर भालके-परिचारक गटाने सत्ता मिळवली. नांदोरे परिचारक-काळे गट ४, बबनराव शिंदे, भालके गट ५ जागा जिंकल्या. नेपतगाव येथे स्थानिक आघाड्यांना समान ३ जागा तर अपक्ष १ उमेदवार विजयी झाला. विटे ग्रामपंचायतीमध्ये एका प्रभागात दोन्ही उमेदवारास समान मते मिळाल्याने चिट्ठी काढून उमेदवार विजयी घोषित करण्यात आला. देवडे ग्रामपंचायतीमध्ये काळे, भालके, परिचारक यांच्या महाविकास आघाडीने ९ जागा जिंकल्या आहेत. चिलाईवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परिचारक गटाने जोरदार मुसंडी मारली. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांच्या गटाचा ५ विरुद्ध ४ असा पराभव केला. वाखरी ग्रामपंचायतीत विठ्ठल परिवाराला ८ तर परिचारक (नाना गोसावी आघाडी) नऊ जागा मिळाल्या.
बोहाळी भालके-काळे ६, परिचारक ५ जागा, शेगाव दुमाला भालके ७ आणि परिचारक ४ जागा, चिंचोली भोसे परिचारक-शिंदे ४ आणि भालके गट ३ जागा, अनवली ग्रामपंचायत स्वाभिमानी विकास आघाडी ९ तर देशमुख-शिंदे आघाडी २ जागा, आव्हे परिचारक-काळे आघाडी ८ तर भालके गट १, उजनी वसाहत ग्रामपंचायत सर्व ७ जागा परिचारक गटाने जिंकल्या.
सिद्धेवाडी ग्रामपंचायतीमध्ये परिचारक-अवताडे-काळे गटाने ११ जागा जिंकत सत्ता परिवर्तन केले. येथे भालके गटाला एकही जागा मिळाली नाही. शिरगाव ग्रामपंचायततीच्या निवडणुकीत परिचारक गट सर्वपक्षीय गट ५ तर परिचारक गटाचे २ उमेदवार विजयी झाले. उंबरे ग्रामपंचायत परिचारक गट ८ जागा तर ३ जागा स्थानिक कोरके गटाने जिंकल्या.
ओझेवाडीमध्ये परिचारक गट ७ तर, भालके-परिचारक गटाने ४ जागा जिंकल्या. मुंढेवाडीत नोटाने रंगत आणली. प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वाधिक ४२० मते नोटाला मिळाली आहेत. तर नारायण मोरे-परिचारक गट ७ जागा तर भालके-परिचारक गटाने ४ जागा मिळवल्या.
महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गादेगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीय आघाडीने १७ पैकी १४ जागा तर परिचारक आघाडीला ३ जागांवर समाधान मानावे लागले. भाळवणी ग्रामपंचायतीत सर्वपक्षीय आघाडीला १७ पैकी १३ जागांवर तर विरोधी युवक आघाडीला ४ जागांवर समाधान मानावे लागले.
आढीव ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन झाले असून, दिनकर चव्हाण गटाचा धुव्वा उडाला. येथे परिचारक-भालके-काळे आघाडीने १० जागा जिंकल्या तर दिनकर चव्हाण गटाला केवळ १ जागा मिळाली असून तो उमेदवारही केवळ १ मताने जिंकला.
शेळवे गावात परिचारक गटाने ८, काळे-भालके गटाने ३ जागा जिंकल्या. आंबे ग्रामपंचायतीत भालके गटाच्या युवा आघाडीने ७ तर काळे-परिचारक गट ४ जागा मिळाल्या. खेडभाळवणीमध्ये भालके-परिचारक गटाच्या ५ आणि भालके-काळे गटाने ४ जागा जिंकल्या. शेवते ग्रामपंचायतीत विठ्ठलचे संचालक दशरथ खळगे यांच्या गटाने ८ जागा तर परिचारक गटाने ३ जागा जिंकल्या. बाभुळगाव ग्रामपंचायतीत परिचारक गटाने ८, विरोधी भालके-काळे गटाने २ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.
सुस्तेत पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांना धक्का बसला. ४० वर्षांची सत्ता उलथवून टाकत सर्वपक्षीय आघाडीने १३ पैकी ८ जागा तर घाडगे गटाला ५ जागा मिळाल्या. भोसे ग्रामपंचायतीच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विरोधी ५ ही उमेदवार पराभूत झाले.
सोनके ग्रामपंचायतीत भालके-काळे ६ तर परिचारक गटाने ५ जागा जिंकल्या. उपरीमध्ये परिवर्तन झाले असून काळे-भालके गटाने ६ तर परिचारक-भालके गटाने ५ जागा जिंकल्या. तावशीत भालके-परिचारक गटाने ११ तर अवताडे गटाने २ जागा जिंकल्या. सरकोलीत ७ जागा बिनविरोध तर उर्वरित ६ जागा सर्वपक्षीय आघाडीने जिंकल्या. देगाव ग्रामपंचायतीत ८ जागा बिनविरोध तर ५ जागा सर्वपक्षीय आघाडीने जिंकल्या.
कौठाळी ग्रामपंचायतमध्ये परिचारक-काळे गटाने ७ तर विरोधी गटाला ६ जागा मिळाल्या. खरसोळी ग्रामपंचायतीत परिचारक-काळे गटाने ६ तर विरोधी आघाडीने ३ जागा जिंकल्या. कान्हापुरीत परिचारक-शिंदे गटाने ६ तर परिवर्तन पॅनलने ३ जागा जिंकल्या. तारापूरमध्ये परिचारक गटाने १० तर काळे गटाने १ जागा जिंकली. करोळेत ४ जागा बिनविरोध झाल्या तर सर्वपक्षीय आघाडीने ७ जागा जिंकल्या.
सुगाव भोसेच्या भैरवनाथ पॅनल ३, राजूबापू पाटील गट ३, पेहे ग्रामपंचायतीत परिचारक गट ५, शिंदे गट ४, केसकरवाडीत परिचारक गट ६, भालके गट ५, आंबेचिंचोली परिचारक गट ६, शैला गोडसे २, अपक्ष १, भटुंबरे परिचारक ६, भालके ३, नळी परिचारक ६, भालके २, तनाळी भालके-परिचारक-काळे आघाडी ९, नांदोरे शिंदे-भालके गट ५, परिचारक-काळे ४, सांगवी-बादलकोट लक्ष्मीनाराण ग्रामविकास आघाडी ६, समविचारी आघाडी ३, पिराची कुरोलीत काळे गट ५, परिचारक गट ३, शिंदे गट २, अपक्ष ३, करकंब नरसाप्पा देशमुख गट ९, मारूती देशमुख गट ८, पिराची कुरोली काळे गट ५, परिचारक ३, अपक्ष ३, शिंदे गट २, पळशी राष्ट्रवादी ६, परिचारक काळे गट ७, सुपली भालके गट ९, तिसंगी परिचारक ३, काळे-भालके-शेकाप-रिपाइं ८, भंडीशेगाव परिचारक-भालके-काळे गट ११, काळे गट २, खर्डी परिचारक आघाडी १५, चळे परिचारक गट ५, भालके-परिचारक ८, अजनसोंड परिचारक गट ५, भालके-शिंदे गट ४, तपकिरी शेटफळ भालके गट ७, परिचारक गट ३, आवताडे गट १, फुलचिंचाेली भालके-काळे गट ९, परिचारक गट ४, मगरवाडी परिचारक-भालके ८ जागा बिनविराेध तर १ जागेवर भालके गटाच्या उमेदवाराचा विजय झाला. नारायण चिंचोली परिचारक ५, विरोधी गट ४, धोंडेवाडी, गोपाळपूर परिचारक-भालके गट १२, आवताडे-परिचारक-भालके गट ३, रांझणी भालके-परिचारक गट ६, भालके गट ५, कोंढारकी परिचारक-काळे गट ४, भालके गट ३.
फोटो लाईन ::::::::::::::::::::::::::::::
ग्रामपंचायत निवडणुकीत स्व. आ. भालके-काळे गटाने ७ जागांवर विजय मिळविल्यानंतर पटवर्धन कुरोली येथील महिलांनी असा जल्लोष केला.