शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदारांविरुद्ध सोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:02 IST

सोलापूर : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हमीयुक्त आश्वासने देऊन  मानसिक छळ करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ...

ठळक मुद्देफौजदार चावडी पोलीस ठाण्यास ही फिर्याद दखलपात्र स्वरूपाचा फौजदारी गुन्हा करावा, अशी तक्रार दिली

सोलापूर : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हमीयुक्त आश्वासने देऊन  मानसिक छळ करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार (वय ३५, रा. ६६, धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांच्याविरुद्ध आॅनलाईन तक्रार दिली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यास ही फिर्याद प्राप्त झाली. 

मोदी यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दि. ३ मार्च २०१४ रोजी शिवस्मारक, शिंदे चौक, सोलापूर येथे दहा हजार रुपये खर्च करून सभा घेतली. सभेत संविधानावर हात ठेवून मी व माझे छावा संघटनेचे पदाधिकारी व २०० ते २५० लोकांनी नरेंद्र मोदी व भाजपला मतदान करण्याची जाहीर शपथ घेतली.  ९  एप्रिल २०१४ रोजीच्या होम मैदानावरील  मोदी, फडणवीस यांच्या हमीयुक्त आश्वासन व निवडणूक जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून आम्ही १७ एप्रिल २०१४ रोजी भाजपला मतदान केले. सोलापुरातील उमेदवार शरद बनसोडे यांना निवडून आणले. परंतु त्यानंतर गेल्या पाच वर्षांत मोदी यांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. भारताचे जवळपास ५०० सैनिक शहीद झाले, तरी त्यांनी पाकिस्तानच्या सैनिकांना मारले नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या देशप्रेमाचा विश्वासघात केला. 

 शेतकºयांना हमीभाव दिला नाही, काले धन भारतात आणले नाही, तसेच सबका साथ सबका विकासही केला नाही अन् अच्छे दिन ही दाखविले नाही. सोलापुरातील भाषणात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सोलापुरातील कापड उद्योजकांना चालना आणि धनगर समाजाला आरक्षणही दिले नाही. याउलट २०१४ च्या निवडणुकीवेळी दिलेली सर्व आश्वासने ही चुनावी जुमला होता, असे भाष्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले. त्यामुळे मला माझी फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यामुळे वरील आरोपींविरुद्ध माझी लेखी फिर्याद नोंदवून घेऊन त्यांच्यावर दखलपात्र स्वरूपाचा फौजदारी गुन्हा करावा, अशी तक्रार दिली आहे. 

पंतप्रधानांच्या भूलथापांना बळी पडलो- तक्रारीमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार मोदी यांनी भारतभर जाहीर प्रचार सभेत मते देण्यासाठी आश्वासक व हमीयुक्त भाषण करून आमचा विश्वास संपादन केला. मोदी यांनी शहीद होणाºया  जवानांबाबत व सामान्य जनतेच्या देशप्रेमाचे भांडवल करून, ‘मेरा सिना ५६ इंच का है... हमारा एक जवान शहीद हुआ तो मैं पाकिस्तान के दस जवान को मारुंगा’, असे वक्तव्य करून भावनिक आवाहन करून माझा विश्वासघात केला.  मोदी यांच्या काले धन, शेतीमालाला हमीभाव, सबका का साथ सबका विकास व अच्छे दिनच्या खोट्या प्रचारास व जाहिरातीच्या भूलथापांना बळी पडलो, असेही योगेश पवार यांनी नमूद केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ElectionनिवडणूकPoliceपोलिसSharad Bansodeशरद बनसोडे