लोकसभा निवडणुकीत अर्ज अपात्र ठरला तर हायकोर्टातच दाद मागा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:13 PM2019-03-18T13:13:58+5:302019-03-18T13:16:01+5:30
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता असते. उमेदवाराचा अर्ज काही कारणामुळे अपात्र ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता असते. उमेदवाराचा अर्ज काही कारणामुळे अपात्र ठरला तर त्या उमेदवारास अर्ज मंजुरीसाठी उच्च न्यायालयात दाद मागता येते. लोकसभा निवडणुकीसाठी २३ मतदान केंद्रांच्या नावात बदल तर ३0 मतदान केंद्रांच्या स्थानात बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारास विहीत नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करणे आवश्यक असते. कागदपत्रांत त्रुटी असल्यास अर्ज अपात्र ठरतो. उमेदवारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संधी दिल्यानंतरही त्यांच्याकडून कागदपत्र सादर न केल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतो.
राजकीय पक्षाकडून उमेदवारी दाखल करणाºया उमेदवारांना एबी फॉर्म देण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कालावधी देण्यात येणार आहे. उमेदवाराने निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापासून स्वतंत्र बँक खाते सुरू करणे आवश्यक करण्यात आले आहे.
मतदान पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी मतदान केंद्रातील मतदान अधिकाºयांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण राहावे यासाठी आयोगाने सी व्हिजिल अॅप सुरू केला आहे.