हा कार्यक्रम रविवार, दि.१२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहामध्ये होणार आहे.
यावेळी डॉ. एम.के. भांडारकर यांचे ऑनलाइन मार्गदर्शन होणार आहे. आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते, तसेच रोहन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. त्याचबरोबर डॉ. विकास काळे, रत्नमला हुरणे, वनिता जाधव, अंबू गुळवे, संजय जवंजाळ, मच्छिंद्रनाथ नागरे, विजय वडरे, महादेव सावता, सुप्रिया शिवगुंडे यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. तानाजी शिंदे हे त्यांचे विद्यार्थी सोमनाथ माळी यांच्या अंतराळ संशोधनात असेच जडणघडणीत मोठे प्रेरणादायी काम करत आहेत, म्हणून त्यांची निवड डॉ. कलाम पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेसाठी डॉ. हो.ना. जगताप, आशालता जगताप, अरविंद जोशी आदींची उपस्थिती होती.