शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

lokmat Agrostav ; सोलापुरी डाळिंब, ऊस, द्राक्षाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव पंढरपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 6:48 PM

पंढरपूर : आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या सोलापुरी डाळिंब आणि द्राक्ष उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘लोकमत’ने पंढरपूर येथे ‘अ‍ॅग्रोत्सव २०१९’ ...

ठळक मुद्दे‘लोकमत’ने पंढरपूर येथे ‘अ‍ॅग्रोत्सव २०१९’ या कृषी महोत्सवाचे आयोजन केलेयेत्या १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाºया महोत्सवात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कृषीविषयक योजनांची माहिती अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर चर्चाही होणार

पंढरपूर : आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या सोलापुरी डाळिंब आणि द्राक्ष उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘लोकमत’ने पंढरपूर येथे ‘अ‍ॅग्रोत्सव २०१९’ या कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. येत्या १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाºया महोत्सवात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कृषीविषयक योजनांची माहिती अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर चर्चाही होणार आहे.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पंढरपूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा अ‍ॅग्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या जिल्ह्यात डाळिंब, ऊस आणि द्राक्षे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. एकेकाळी ज्वारीचे कोठार समजला जाणारा हा जिल्हा आता कात टाकतो आहे. शेतकºयांचा ओढा नगदी पिकाकडे असून शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्यावर त्यांचा भर आहे. मात्र त्यांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी क्षेत्रात काम करणाºया संस्था-कंपन्या यांचा या अ‍ॅग्रोत्सवात सक्रिय सहभाग असणार आहे.

यात शासकीय योजनांची माहिती, नवे प्रकल्प, नवनवीन संशोधन यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे़ कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ आणि आत्मा या कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी होत आहेत़ महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचेही सहकार्य लाभणार आहे.  चार दिवसांत कृषी प्रदर्शन, नवीन कृषी तंत्रज्ञान, दुग्धोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषीपूरक उद्योग, उत्पादित कृषी मालाला बाजारपेठ, सेंद्रिय शेती यावर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यातील मान्यवरांचे मार्गदर्शन- राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षे, केळी, सीताफळ, चिकू, बोर या फळबागांना जोपासणे हे मोठे संकट आहे. शेतकºयांसाठी हे आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी कमी पाण्यात शेती, उपलब्ध पाण्याचा वापर, सूक्ष्म सिंचन, चारा निर्मिती यावर कृषी क्षेत्रातील मान्यवरांशी सल्लामसलत, चर्चा करण्याची संधी शेतकºयांना उपलब्ध होणार आहे.

पीक उत्पादन स्पर्धा आणि पुरस्कार- सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकरी ऊस, फळबाग उत्पादनात आघाडीवर आहेत. त्यांच्या कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, दर्जेदार आणि विक्रमी पीक उत्पादन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकºयांना विक्रमी पीक उत्पादनाबाबत पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात येणार आहे. तरी पश्चिम महाराष्टÑातील शेतकºयांनी जास्तीत जास्त संख्येने या पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्टÑातल्या शेतकºयांसाठी लोकमतने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. पश्चिम महाराष्टÑातील शेतकºयांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून डाळिंब, द्राक्षे अन् ऊस यांच्यासह इतर पिकांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही शेतकºयांना मिळणार आहे.  याचा लाभ शेतकºयांनी घ्यावा.- प्रशांत परिचारकआमदार

सोलापूर जिल्हा फळबागांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. पाणीटंचाईवर मात करून शेतकरी डाळिंब, द्राक्षे पिके घेतात. सध्याच्या दुष्काळी स्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ऊस उत्पादनात येथील शेतकरी आघाडीवर आहेत. कृषी तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास ते कृषी क्षेत्रात क्रांती करतील इतकी त्यांच्यात क्षमता आहे. लोकमत आणि शासनाचा कृषी विभाग यांनी आयोजित केलेले प्रदर्शन महत्त्वाचे आहे.-  बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

कोल्हापूर, बार्शी व अन्य ठिकाणी शेतकºयांना कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पैसे खर्च करून जावे लागते. मात्र पंढरपूरमध्ये लोकमतने कृषी प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचा सर्व क्षेत्रातील शेतकºयांना लाभ घेता येणार आहे. तसेच शेतकºयांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामुळे लोकमतचे आभार.- वसंतराव देशमुखउपाध्यक्ष, पांडुरंग कारखाना, श्रीपूर

दुष्काळातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी लोकमतच्या अ‍ॅग्रोत्सवातून कृषी तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन मिळणार आहे. डाळिंबाचे दर घसरले आहेत, निर्यात घटली आहे, त्यात वाढ करण्याविषयी या अ‍ॅग्रोत्सवाला अधिक महत्त्व आहे. थेट शासनापर्यंत डाळिंब उत्पादकांच्या व्यथा मांडण्यासाठी लोकमतचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष अ. भा. डाळिंब उत्पादक शेतकरी संघ

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटagricultureशेती