सोलापूर : मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजीत सिंह नाईक- निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज माढा येथे सकाळी अकरा वाजता सभा होणार आहे.
या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा, एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटाचे राज्यभरातील दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत.
दरम्यान, सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या सभेसाठी कृषी विभागाची ५३ एकर जागा आहे. या जागेत खुच्र्चा, व्हीआयपी कोच बैठकीसाठी असणार आहेत. सावलीसाठी जर्मन अॅन्गल पद्धतीचा मंडप, सहा हेलिपॅड, व्हीआयपी कक्ष, ४० एकर पार्किंग, प्रवेशास सकाळी ६.३० पासून सुरुवात होणार आहे. मोठ्या बॅग, पाण्याच्या बॉटल, खाद्यपदार्थ, ज्वालाग्रही पदार्थ जसे लायटर, काडीपेटी आदी तसेच विडी, सिगारेट, गुटखा आधी बाळगण्यास पोलिसांनी पत्रकारद्वारे मज्जाव केला आहे.
नातेपुते-माळशिरस ते अकलूज यासाठी पर्यायी मार्ग नातेपुते फाटा (माळशिरस यादव पेट्रोलपंप) राष्ट्रीय महामार्गान पानीव पाटी मार्गे अकलूज असा असणार आहे. सभेसाठी पार्किंग व्यवस्था पालखी तळ, बीज केंद्राची जागा, जोशी यांचे पालखी तळाजवळील शेत, कन्या प्रशाला मैदान आदी ठिकाणी करण्यात आली आहे.