शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

आमदार झाल्यासारखं वाटतंय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 3:14 PM

विलास जळकोटकर (दहीदुधाचे माठ घेऊन निघालेल्या मावशी अन् गवळणींची लगबग सुरू आहे. गोकुळनगरी ओलांडून बाजारात प्रवेश करतानाच वेशीवरच कृष्णदेवाचा ...

विलास जळकोटकर

(दहीदुधाचे माठ घेऊन निघालेल्या मावशी अन् गवळणींची लगबग सुरू आहे. गोकुळनगरी ओलांडून बाजारात प्रवेश करतानाच वेशीवरच कृष्णदेवाचा बॉडीगार्ड पेंद्या त्यांची वाट अडवतो) पेंद्या : थांबाऽऽ कुठं चाललाव. पुढं जाता येनार न्हाय.मावशी : कोन हाईच रे रताळ्या...पेंद्या : मावशे आडवंतिडवं बोलायचं काम न्हाय. न्हायतर....मावशे: नाहीतर काय रं, कोन लागून गेलायंस तू. पेंद्या: आमी आमच्या राजाचे बाडीगार्डमावशी: मग जा की, हितं कशाला कडमडायला आलायचपेंद्या: टोलनाक्यावर पावती फाडल्याशिवाय सोडायचं नाही, हुकम हाय.गवळण:  (लडिवाळपणे) आता गं बया, ह्योे कसला टोल घिवून   बसलाव. बाजाराला काय आमी आताच येताव व्हय. आमची वळख न्हाय काय?पेंद्या: हे बगा! गवळणींनो ते मला काय माहीत न्हाय. आमचा राजा इलेक्शनला उभा राह्यलाय. त्यांच्यासाठी मदतनिधी हुभा कराचाय. पावती फाडा न्हायतर बाजारात परवेश न्हाय... (मावशी वैतागते)मावशी: अरं ये मुडद्या. लई मोठ्ठा ‘दादा’ लागून गेलाच व्हय. राजकारनातला किंगमेकर झाल्यागत वाटाय लागलंय?  पेंद्या: (डोकं ठिकाणावर आल्यागत) मावशे काय बी बोलायचं काम नाही.मावशी:  काय करनार रं.पेंद्या: राज्य आमचं हाय. आमी कायबी करू.मावशी: (ंबांगड्या सावरत) का रं लई शाना झाला व्हय. एका बुक्कीतच गार करीन. आमी बायकांनीबी बंड केल्यावर कळंल. पेंद्या: (बाह्या सावरत)येऽऽ मावशे बंडाची भाषा सोडून बोल. अगुदरच आमच्या राजाला बंड थंड करता करता नाकीनऊ आलंय. मावशी: मग आता वाट सोडतू का मारु हाळी पेंद्या : जाऊ दे जा बाय. कुनाला सांगू नकू आमचा राजा मला कच्चं खाईल. मावशी: आता कसं आला वटनीवर (मावशी पुढे आणि गवळणी पेंद्याला ठेंगा दाखवत बाजाराकडं झपझप पावले टाकत निघतात.)गवळण: (बाजारात फुकट प्रवेश मिळाल्याने उत्साहित झालेली गवळण म्हणाली) मावशेऽऽ तुला मानलं बाई. पेंद्याला थंडच केलंस की.मावशे: ह्यलाच राजकारन म्हनत्यात. भिलं की ते आपल्याला खिळवित्यात. मग आपुनबी त्यंला खिळविलं फायजी.   गवळण:  मावशे! तू बी पक्की राजकारन्यासारकं बोलाय लागलीस की. मावशी:  मग उगं पांढरी झाल्ये व्हय गं माजे केस.आता तर इलेक्शनचा मोसम हाय. समदे  उकाळ्यापाकाळ्या काढायला टपून बसल्यातीगवळण : पन, मावशे तिकडं बार्शीत, पंडपूर-मंगुड्यात,करमाळ्यात आन् सांगूल्यात लई घासूनपुसून चाललंय म्हनं. समद्याला ‘आमदारच झाल्यासारकं वाटाय लागलंय म्हनं.मावशे: तितलं काय सांगावं बाई. तितं काय समदा मलिदाच मलिदा   हाय. गवळण: म्हणून काय समदे आमदार व्हनार असत्यात व्हय.मावशी: जाऊ दी की तुला काय कराचाय? गवळण: (घुश्यात येत) आता गं बया, मला आपलं वाटलं म्हनून      बोल्ले.दुसरी गवळण: लई शानी हाईस चल निवडणुकीच्या अगुदरच  त्यनला आमदारासारकं वाटतंय तर वाटू दी की, आपल्यात भांडण कशाला चला!मावशी: पोरीनों झालं तेवडं पुरान बास्स. चला बाजार आला बग. (बोलतच बाजाराकडे वळतात आणि नेमकं त्याचवेळी समोरुन एक टमटम भडऽऽभडऽऽभड आवाज करीत निघालेलं आतल्या साऊंडवर नेमकं ‘जवा बगतीस तू माज्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ हेच गाणं लागलेलं ते ऐकून साºयाच फिदीफिदी हसत बाजाराकडं वळतात).

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण